
इगतपुरीनामा न्यूज – मानवेढे येथे झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पेहरेवाडी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. धावण्याच्या स्पर्धेत पेहेरेवाडीचा खेळाडू विशाल शिद याने ४०० मीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम दोन सामने एकहाती जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली. अटीतटीची लढत होऊन अंतिम सामना पेहेरेवाडीने तीन गुणांनी जिंकत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला. मुलींच्या खो-खो स्पर्धेत पेहेरेवाडीच्या मुलींनी नेत्रदीपक खेळ करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला. विजेत्या दोन्ही संघांना गटशिक्षणाधिकारी पाटील, विस्ताराधिकारी शिवाजी अहिरे, निवृत्ती तळपाडे, ज्ञानेश्वर भोईर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मारुती कुंदे, नामदेव साबळे, दत्ता साबळे, उत्तम भवारी, माणिक भालेराव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना गोरख तारडे, जनार्दन शिंदे, सुखदेव साबळे, निलेश दखणे, मनीषा हिरे, सुप्रिया पाटेकर, विक्रांत खडके यांचे मार्गदर्शन लाभले. विस्ताराधिकारी राजेंद्र नांदुरकर, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक पांडुरंग शिंदे, शालेय समिती अध्यक्ष रामा शिद, सरपंच कलावती खडके, उपसरपंच कैलास कडू, मोहन शिद यांनी अभिनंदन केले आहे.