‘माँ जिजाऊ’ सारख्या माता जन्माला आल्या तरच ‘शिवबा’ निर्माण होतील – सुप्रसिद्ध गीतकार प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे : केपीजी महाविद्यालयात स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थी आणि महाविद्यालये नव्या भारतासाठी प्रेरणास्रोत आहेत. समस्यांचा बाऊ न करता यश मिळेपर्यंत लढायला शिका. आईवडील गुरुजनांचे स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागा. यासह मुलींमध्ये महापुरुष जन्माला घालण्याची क्षमता आहे. माँ जिजाऊ सारख्या माता जन्माला आल्या तरच शिवबांसारखे महापुरुष जन्माला येतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, गायक , समाजप्रबोधनकार प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे यांनी केले. इगतपुरी येताजील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने  महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते. ‘मविप्र’ सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, इगतपुरी तालुक्याच्या तळागाळातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गोवर्धने महाविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद आहे. याचा संस्थेला निश्चितच अभिमान आहे. व्यावसायिक कुस्तीचा अनुभव यावा म्हणून मातीत कुस्ती खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षण आपण देत आहात. अंगभूत कौशल्याच्या बळावर अनेक क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौतुकास्पद कामगिरी अभिमानास्पद आहे. यावेळी ‘मविप्र’चे उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक ॲड. संदीप गुळवे, डॉ. प्रसाद सोनवणे, विजय पगार, रमेश पिंगळे, व्यवस्थापन समिती सदस्य आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. किरण रकिबे यांनी महाविद्यालयात वर्षभर चालणाऱ्या घडामोडींचा, उपक्रमांचा प्रगती व विकासाचा लेखाजोखा मांडला. विद्यार्थ्यांसाठी लवकरच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बस घेणार आहे. हे महाविद्यालय महामार्गावर असल्याने इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभे करून आर्थिक स्त्रोत वाढविणार आहोत. मुख्य इमारतीच्या शेडवर सोलर पॅनल बसवून महाविद्यालयाच्या विजेची गरज भागविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विजय कर्डक यांनी कुस्ती स्पर्धेतील विद्यार्थांना प्रोत्साहनासाठी बक्षिस जाहीर केले. पाच प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट प्राप्त केले असून एका प्राध्यापकाने लघु संशोधन प्रकल्प मिळवला आहे. दहा प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात शोधनिबंध सादर केला. उपक्रम माहिती व प्रसार क्षेत्रात कामगिरीबद्दल प्रा. संजय फाकटकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. वर्षभर दत्तक झाडे जतन करणाऱ्या भूगोल व इंग्रजी विभागाला विभागून वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एनसीसी प्रमुख प्रा. एस. एस. परदेशी यांनी कॅप्टन पदासाठीचे प्रशिक्षणासाठी सत्कार झाला. विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. डॉ .बी. सी. पाटील,  प्रा. एस. एम. देसाई यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. किरण रकिबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डॉ. व्ही. बी. राठोड, क्रीडा संचालक प्रा. हरिश वसावे, सांस्कृतिक प्रमुख डॉ. कल्पना वाजे, प्रा. के. के. चौरसिया आदींनी परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!