रोटरीच्या मदतीची चाके‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेतील – गोरख बोडके : रोटरी क्लब हिलसिटीतर्फे ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना सायकली वाटप

इगतपुरीनामा न्यूज – ग्रामीण भागात अनेक गरीब आदिवासी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घरातील विद्यार्थ्यांना पायी धडपड‎ करीत शाळा गाठावी लागते.‎ काहींना तर घरचे थोडे फार कामही‎ करावे लागते. यासह नियमित सायकल चालवून शरीर संपदाही चांगली राहू शकते. म्हणून आज रोटरी क्लबच्या वतीने शिरसाठे गावातील ८ ते १० इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. यावेळी रोटरी क्लब हिलसिटी इगतपुरीचे अध्यक्ष गोरख बोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की शाळा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणि घराचे अंतर या गरजू‎ विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय ठरू नये‎ म्हणून सायकलची छोटीसी भेट रोटरीतर्फे देण्यात आली. ग्रामीण विद्यार्थी घडले तर त्यांच्याकडून गावाचे, देशाचे नाव उज्वल केले जाऊ शकते. याची दखल घेऊन हा सायकल वाटपाचा उपक्रम घेतला आहे. रोटरीची मदतीची चाके‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सायकलींच्या चाकांप्रमाणे पुढेच‎ चालत राहतील. ही सायकलीची‎ चाके विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेतील,‎ असा विश्वास गोरख बोडके यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सायकल मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत‎ होता.‎ आनंदी झालेल्या विद्यार्थ्यांनी या सायकल्सचे उत्तम संगोपन करू असे वचन दिले. वाटप कार्यक्रमावेळी सरपंच, मुख्याध्यापक, ग्रामसेवक उपस्थित होते

Similar Posts

error: Content is protected !!