इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – इगतपुरी तालुक्यातील दौंडत ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी विठ्ठल देवराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच विठाबाई पांडुरंग रजेवर असल्याने विद्यमान उपसरपंच विठ्ठल शिंदे यांना प्रभारी सरपंच पदाची सूत्रे देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे परिसरातून स्वागत होत आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – अखिल भारतीय आदिवासी कॉंग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील राजू काळू गांगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणूनही राजू गांगड काम पाहतात. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी शिवाजी एकनाथ फोकणे यांनी निवडणुक विवाद अर्ज दाखल केला होता. त्याबाबत वेळोवेळी सुनावणी कामकाज घेऊन पुरावे अवलोकन करण्यात आले. त्यानुसार सरपंच ताई बिन्नर यांचे पती आणि सासरे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल आज लागले आहेत. यामध्ये पहिल्याच प्रयत्नात स्वराज्य संघटनेला अपेक्षित यश मिळाले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात ८९ ग्रामपंचायत सदस्य व १३ थेट सरपंच म्हणून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते निवडुन आले आहेत. यामध्ये कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, बीड, लातूर, अहमदनगर, परभणी, रायगड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. महानगरपालिका, नगरपालिका, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – इगतपुरी तालुक्यातील २ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. हेलिकॉप्टरमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर ह्या निवडून आल्या. गाजलेले दिवंगत हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी तालुक्यातील व्यापार नगरी घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी श्रीकांत रमेश काळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांना सूचक म्हणून रामदास भोर होते. मंजुळा नागरे यांच्या अर्जाला सूचक म्हणून भास्कर जाखेरे होते. १७ सदस्य असलेल्या घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचच्या निवडीप्रसंगी १६ सदस्य उपस्थित होते. हात वर करून १५ सदस्यांनी श्रीकांत काळे यांना कौल […]
दीपक भदाणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीमुळे महाराष्ट्राचे राजकीय ध्येय साध्य होऊन सामान्य नागरिकांचे राज्य येईल. देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानाला अभिप्रेत असणारी लोकशाही, राज्यकारभार आणि राज्यसत्ता आपल्याला पाहिजे आहे.देशात भीती वाटावी असा राज्यकारभार सुरु आहे. सत्ताधाऱ्यांची एकतर्फी घमेंड असून लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा त्यांचा मानस आहे. ते मोडून […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील कोकणेवाडी येथे सोमवारी ग्रामसभा पार पडली. घोटी खुर्द गावासाठी ७५ हजार व वाड्या वस्तीसाठी १ लाख लिटरचा उंचावरील जलकुंभ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री जलजीवन मिशन योजनेच्या कामात विष्णू गोडसे यांनी विविध फेरबदल करण्याचे सुचवले होते. त्यास सरपंचासह सर्व ग्रामस्थांनी कडाडुन विरोध केला. आपले म्हणणे मान्य […]
संभाजी ब्रिगेडमध्ये मोठ्या संख्येने होणार प्रवेश सोहळा दीपक भदाणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 30मुलुख मैदानी तोफ म्हटले जाणारे शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरोगामी विचारांची ज्वलंत संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई नाका परिसरातील भाभानगर येथील ३ हजार क्षमता असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात […]
ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. 13 ग्रामपंचायत कायद्यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शपथ घेण्याची कोणतीही तरतूद नाही. अशा स्थितीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचासह उपसरपंच आणि काही सदस्यांनी सोमवारी शपथविधी सोहळ्याचे आयोजन केले आहे. निव्वळ स्टंटबाजीसाठी हा कार्यक्रम होत असून ग्रामपंचायतीच्या निम्म्या सदस्यांना विश्वासात न घेता लोकांच्या कररूपी पैशांचा दुरुपयोग करण्यात येत आहे. ह्या स्टंटबाजीला […]