स्वतःच्या उद्धारासाठी नव्हे, तर गावांच्या शाश्वत विकासासाठीच डॉ. शरद तळपाडे वाडीवऱ्हे गटातून लढणार 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – ज्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई कोरोना काळातील आजारांच्या उपचारासाठी खर्च होऊन कुटुंबाची कायमची वाताहत झाली असती अशा सामान्यातल्या सामान्य माणसांना विविध प्रकारे जीव ओतून जीवदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोंदे दुमाला येथील डॉ. शरद मंगलदास तळपाडे…!दुर्गम आदिवासी कुटुंबातून डॉक्टर होऊनही त्यांनी सर्वच समाज घटकांसाठी विविध प्रकारे काम केले. हे काम करतांना वंचित तळागाळातील नागरिकांसह सर्वच क्षेत्रातील लोकांशी नेहमीच संपर्क ठेवला. रोजगार, आरोग्य, शासकीय योजना, व्यसनाधीनता, शिक्षण आदी विषयांवर अत्यंत अभ्यासूपणाने विवेचन करून सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते जीवाचे रान करतात. गोरगरीब, अल्पशिक्षित, अशिक्षित, असंघटितांसह सर्वच लोकांच्या भल्यासाठी डॉ. शरद तळपाडे काम करत आहेत. उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकटेपणाने जोरदारपणे लढत राहणं सोपं नाही, पण ते काम डॉ. शरद तळपाडे करीत आले आहेत. त्यांनी इगतपुरी तालुक्यात स्वतःच्या स्वतंत्र विचारसरणीच्या बळावर स्वतःची एक वेगळी वाट निर्माण केली आहे. अर्थात खाचखळग्यांची, काट्याकुट्यांची पर्वा न करता लोकांचे विविध प्रश्न सोडवण्याचे कौशल्य त्यांनी दाखवलं आहे ते स्वतःच्या उद्धारासाठी नव्हे, तर लोकांना खरा शाश्वत विकास आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठीच…! हे लोकसेवेचे दैवी कार्य अखंडित सुरू राहण्यासाठी लोक आग्रहात्सव इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातून डॉ. शरद तळपाडे हे निवडणूक लढवणार आहेत. ह्या गटाच्या विविधांगी विकासासाठी राज्यात आणि केंद्रात सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून संधी मिळणार आहे. वर्षानुवर्षे वाडीवऱ्हे गटाला विकासाच्या ऐवजी दारिद्र्य देणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी डॉ. शरद तळपाडे हा एकमेव पर्याय आहे. म्हणूनच लोकांसाठी ते निश्चितच वाडीवऱ्हे गटातून जिल्हा परिषदेत गेल्याशिवाय राहणार नाही.

error: Content is protected !!