कणखर कार्यकर्तृत्वातून प्रशासनाला लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडणारे गोपाळा लहांगे : सामान्य माणसांचा बुलंद आवाज बनून जिल्हा परिषदेत जाणारच..!

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी पंचायत समितीचे कुशल सभापती आणि तालुक्यात मोठ्या असणाऱ्या वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीचे सरपंच पद अशा अनेक पदांच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील नागरिकांच्या हितासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्व अशी गोपाळा दगडू लहांगे यांची सर्वत्र ओळख आहे. आपल्या कणखर कार्यकर्तृत्वातून प्रशासनाला लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडणं असं त्यांच्या कामाचं मुख्य सूत्र आहे. तीन दशकांत इगतपुरी तालुक्यात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करीत त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला. स्वतंत्र कामांची आणि विचारांची शैलीही त्यांनी निर्माण केली. आजच्या हितसंबंधांच्या राजकारणाच्या काळात अपप्रवृत्ती एकत्र येऊन सत्ता ताब्यात घेतात आणि समाजातील सामान्य लोकं असहाय्यपणे परिस्थितीकडे पाहत राहतात. गोपाळा लहांगे यांना हे अजिबात मान्य नाही. सामान्य लोकांचा आवाज बुलंद होऊन ही ताकद एकत्र यायला हवी, ताकद एकटवून व्यवस्थेला दणका ध्यायला हवा हे त्यांचे सूत्र आहे. यासाठीच वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढण्याचा आणि विजयी होण्याचा निर्धार केला आहे.

गोपाळा लहांगे यांच्याकडे काम घेऊन आलेल्या प्रत्येक माणसांचे काम कमीतकमी वेळात व्हावं यासाठी ते नेहमीच कार्यरत दिसून आले आहेत. कारण काम घेऊन आलेल्या माणसांमध्ये ते स्वतःला पाहत असतात. गोपाळा लहांगे हे बहुआयामी व्यक्तिमत्व संकटसमयी कोणाच्याही मदतीला धावून जात माणुसकीचा धर्म पाळताना दिसतात. विविध क्षेत्रांत गोपाळा लहांगे यांनी केलेलं काम खूप मोठं आहे. वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटाचे विकासाचे चित्र चांगले व्हावे, संपूर्ण गटाचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा, गोरगरीब सामान्य लोकांसह गटातील सर्वच नागरिकांचे प्रश्न, समस्या मुळापासून सोडवाव्या, वाडीवऱ्हे गटाला नवी दिशा मिळावी, प्रत्येक माणसांच्या हृदयात वसलेल्या ईश्वराला संतुष्ट करावे अशा काही मुद्यांवर गोपाळा लहांगे हे वाडीवऱ्हे जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढवणार आहेत. अनेकांना आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी पदे मिळवून देण्यात गोपाळा लहांगे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता त्यांना स्वतःला नाशिक जिल्हा परिषदेत लोकांचा आवाज बनवून पाठवण्यासाठी जनता अत्यंत उत्सुक आहे. त्यांच्यातील प्रयोगशीलता, सामाजिक जबाबदारी, माणुसकी ह्या जोरावर ते नक्कीच जिल्हा परिषद सदस्य पदावर पोहोचून वाडीवऱ्हे गटाला महाराष्ट्राच्या नकाशावर अद्वितीय स्थान निर्माण करून देतील ह्यात शंका नाही.

error: Content is protected !!