इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले आणि त्यांचे सुपुत्र बाळासाहेब झोले यांनी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत बाळासाहेब झोले यांनी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी उमेदवारी करणार नसल्याचे आज जाहीर केले आहे. पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार […]
इगतपुरीनामा न्यूज – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी शेवटच्या क्षणी व्यक्तिशः लक्ष घालून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे तिकीट लकीभाऊ जाधव यांना दिले. राहुल गांधी या मतदारसंघात प्रचाराची सभा सुद्धा घेण्याची शक्यता आहे. इंदिरा काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाचे आक्रमक लढाऊ नेतृत्व […]
इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवानेते तथा उमदे नेतृत्व लकीभाऊ भिका जाधव यांना इंदिरा काँग्रेसने इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. २०१९ ला त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळवली मात्र त्यावेळी त्यांना जवळपास १० हजार मते मिळून ते पराभूत झाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षासाठी इगतपुरी मतदारसंघ दिलेला असल्याने त्यांना आज […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र युवा नेते जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले मंगळवारी २९ तारखेला धनोत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने पाथर्डी फाट्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचे जल्लोषात स्वागत करून अर्ज भरण्यासाठी सदिच्छा देण्यात येणार आहे. माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते […]
इगतपुरीनामा न्यूज – महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि इतर मित्रपक्षांचे इगतपुरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ करण्यात येणार आहे. उद्या रविवारी सकाळी १० वाजता इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला जाणार आहे. यावेळी श्रीफळ फोडून विधानसभा मतदारसंघाचा दणक्यात शुभारंभ […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील मोठा पक्ष असणाऱ्या इंदिरा काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे अद्याप समोर आलेले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा उमेदवाराची निश्चिती केली नाही. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे पण “कुछ” तो बडा करनेवाले है अशी चर्चा रंगली आहे. माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र बाळासाहेब झोले यांनी अपक्ष […]
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आमदार खोसकर यांच्यावरील जनतेचा विश्वास आणि वाढवलेला जनसंपर्क पाहता इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार हिरामण खोसकर विजयी होतीत […]
इगतपुरीनामा न्यूज – शिवसेना शिंदे गटाची जागा असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदारांना तिकीट जाहीर केले आहे. मात्र महत्वाच्या संस्थांनी केलेल्या ताज्या निवडणूक सर्व्हेमध्ये माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचेच नाव संभाव्य विजेत्यांच्या यादीत आल्याचे वृत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत काशिनाथ मेंगाळ हे विजयी होणार असल्याचा अहवाल आहे. काशिनाथ मेंगाळ यांनी इंदिरा काँग्रेसतर्फे उमेदवारी करावी […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात त्र्यंबकेश्वर १९६२ पर्यंत नाशिक मतदारसंघात समाविष्ट होते. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्र्यंबकेश्वरचा समावेश इगतपुरी मतदारसंघात झाला. मतदारसंघाचे स्वतंत्र अस्तित्व नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरची सातत्याने उपेक्षा झाल्याची लोकभावना आहे. आजवर या भागातील एकाही स्थानिक व्यक्तीला कोणत्याच पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिलेली नाही. १९६२ पासून मतदारसंघावर काँग्रेसचे […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी मतदारसंघाची पहिली निवडणूक १९५७ साली पार पडली. या स्वतंत्र मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान कम्युनिष्ठ पक्षाचे पुंजाबाबा गोवर्धने यांनी प्राप्त केला. शेतमालाला काळ्या बाजाराच्या विळख्यातून सोडविण्यासाठी भाताचा लढा उभारून पुंजाबाबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केला. निस्पृह व्यक्तिमत्व असलेल्या पुंजाबाबा यांचा प्रभाव १९६२ च्या निवडणुकी पर्यंत […]