शिवसेना धनुष्यबाण नगराध्यक्ष उमेदवार शालिनीताई खातळे यांना शहरात सर्वाधिक प्रतिसाद : प्रभावी प्रचार, सुयोग्य मांडणी आणि कार्य कर्तृत्व नागरिकांत प्रभावी

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या स्वतंत्र प्रचारशैलीने मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी तंत्र राबवण्यात येत आहे. आपापली सत्तास्थाने बळकट असल्याचे समजून विविध आश्वासने देण्यात येत आहे. निवडणुकीला जातीय स्वरूप येऊ न देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. इगतपुरी नगरपरिषदेवर शिवसेना धनुष्यबाण पक्षाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आणि रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी यांचे कौशल्यदायी प्रभावी प्रचारतंत्र सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी सौ. शालिनीताई संजय खातळे यांना संपूर्ण इगतपुरी शहरात प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले आहे. इगतपुरी शहराचा कायापालट करण्यासाठी संपूर्ण खातळे परिवाराची खरोखर मोठी क्षमता आहे. म्हणून यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवल्यास आपले मत वाया जाणार नाही अशी लोकभावना दिसून आलेली आहे. शालिनी संजय खातळे यांचा वाहनांतून प्रचार, प्रसिद्धी पत्रके, सोशल मीडिया आदी साधने वापरली जात असली तरी प्रत्येक मतदाराला त्या व्यक्तिगत भेटून भूमिका समजावत आहेत. त्यांना भेटून नागरिकांकडून अनोखा प्रतिसाद मिळत आहे. इगतपुरीला विकसित करण्यासाठी शालिनीताई संजय खातळे यांच्याकडून खऱ्या अर्थाने ताकद लावली जाईल असा नागरिकांचा विश्वास आहे. त्यांच्यासोबत सर्व प्रभागातील उमेदवारही मतांचे दान मागत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय खातळे, विनायक पाटील, फिरोज पठाण यांच्या नियोजनानुसार शालिनी खातळे आणि त्यांच्या उमेदवारांनी प्रत्येक प्रचार पद्धतीत आघाडी घेतल्याचे दिसते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण झाल्याने सर्वांना विजयाची खात्री वाटते आहे. सत्ताधारी पक्षाने शहराची लावलेली वासलात मतदारांना सांगण्यात येऊन विकासाचा खरा अर्थ समजून सांगण्यात येत आहे. मतदारांचा मोठा प्रतिसाद असल्याने सत्ता काबीज करू असा सर्वांचा दावा आहे. नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शालिनी संजय खातळे सक्षम आणि संपूर्ण ताकदीने इगतपुरी शहराला नवी दिशा देणार असल्याने त्यांना सर्वाधिक पसंती लाभली आहे.

error: Content is protected !!