
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – उमेदवारी केवळ मतांची नसते, तर मनांना व हृदयांना जिंकणारी पण असते. संपूर्ण इगतपुरी शहराचा विकासाच्या कामांनी कायापालट करायचा आहे. लोकांच्या विकासाच्या आशा अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक प्रभाग विकसित करण्यासाठी सूत्रबद्ध काम उभं करायचं आहे. शासकीय योजना राबवून गोरगरीब सामान्य नागरिकांना आनंदी करणार आहोत. इगतपुरीच्या नागरिकांसाठी शाश्वत विकास करण्याचं आमचं ध्येय आहे. संपूर्ण इगतपुरी शहरात आम्हाला अतिशय निर्णायक असा प्रतिसाद लाभत आहे. प्रचार काळात अनेक नागरिक आम्हाला निश्चिन्त राहून विजयी होण्याचा आशीर्वाद देताहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनातील विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्हीही जीवाचे रान करू अशी मनमोकळी प्रतिक्रिया शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. शालिनीताई खातळे यांनी दिली. न थकता न थांबता अखंडपणे इगतपुरी शहरात प्रचार सुरु असतांनाही शालिनीताई इगतपुरीच्या विकासाबाबत भरभरून बोलल्या. खातळे परिवारावर शहराचा कायम मायेचा आणि आशीर्वादाचा हात आहे. आतापर्यंत निव्वळ आश्वासने देऊन नागरिकांना वेड्यात काढले गेल्याचा संतापही शालिनीताई खातळे यांनी व्यक्त केला. आता थांबायचं नाही, सर्व प्रभागात विकासाची गंगा आणायचीच असा संकल्पही त्यांनी बोलतांना केला. येत्या २ डिसेंबरला मतदार बंधू भगिनी निश्चितपणे नगराध्यक्ष पद आणि सर्व प्रभागात आमच्या सर्वांवर मतदानरुपी आशीर्वाद देतील असा आम्हाला विश्वास वाटतो असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय खातळे यांनी यावेळी मांडले.