आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम अतिशय प्रेरणादायी – गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने : तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका अंतर्गत तायक्वांदो बेल्ट प्रमोशन २०२४ संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम अतिशय प्रेरणादायी असून यांच्यामार्फत उत्कृष्ठ खेळाडू उदयाला येत आहेत. ह्या सर्वांच्या सामूहिक शक्तीने इगतपुरी तालुक्यातील खेळाडू आपल्या कौशल्यातून भरीव यश मिळवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा […]

ज्ञानदर्पण पुरस्काराने माजी सैनिक किसन हंबीर सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – खैरगावचे भूमिपुत्र माजी सैनिक किसन हंबीर यांना किड्स किंग्डम एज्युकेशन सोसायटी व ज्ञानदर्पण साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने “ज्ञानदर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवृत्त पोलीस अधिकारी संजय अपरांती, भारत हबीब सय्यद यांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार देण्यात आला. माजी सैनिक किसन हंबीर यांनी सैन्यदलात जम्मू काश्मीर, सिक्किम, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, […]

राष्ट्रवादीच्या इगतपुरी तालुका कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब खातळे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथील भाऊसाहेब सखाराम खातळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार )पक्षाच्या इगतपुरी तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहचवण्यासाठी कामाला लागा असे […]

नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे दणदणीत यश : अध्यक्षपदी प्रमोद ठाकरे तर उपाध्यक्षपदी देवेंद्र हिरे यांचा विजय

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे मानद अध्यक्ष कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने संपूर्ण ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद सिताराम ठाकरे हे विजयी झाले. तर उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र कृष्णाजी हिरे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी संजय गिरी, महिला उपाध्यक्षपदी कांचन गुलाबराव आनट, कार्याध्यक्षपदी अशोक भिवराज […]

नाशिकला कृषी व नवतेजस्विनी महोत्सवाचे उदघाटन : शेतकऱ्यांना विविध पुरस्कार प्रदान करतांना आनंद -पालकमंत्री ना. दादा भुसे

इगतपुरीनामा न्यूज – उत्तम शेतीमुळे समाजापुढे आदर्श उभा करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ठ कामासाठी आत्मा अंतर्गत विविध पुरस्कार प्रदान करतांना आनंद होत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामाची ओळख होवून प्रेरणा निर्माण होईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जि. […]

पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना शासनाचा ‘आदर्श कृषी विस्तारक’ पुरस्कार घोषित : १० ते १४ फेब्रुवारीला नाशिकच्या कृषी महोत्सवात होणार वितरण

इगतपुरीनामा न्यूज – शेतीतील नाविन्याचा शोध घेत अनेक शेतकऱ्यांना तळमळीचे पत्रकार लक्ष्मण सोनवणे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या विविध आदर्श कामांमुळे त्यांना शासनाचा ‘आदर्श कृषी विस्तारक’ पुरस्कार घोषित झाला आहे. १० ते १४ फेब्रुवारीला नाशिकला होणाऱ्या कृषी महोत्सवात पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक […]

वेदांत शिर्के याचे तायक्वांदो स्पर्धेत सुयश

इगतपुरीनामा न्यूज – वेदांत रोहिदास शिर्के ह्याने ३२ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर, ज्युनिअर क्योरूगी व ९ वी पुमसे तायक्वांडो स्पर्धा २०२३-२४, वजन गट ४५ ते ४८ किलो मध्ये कांस्य पदक पटकावले. नाशिक क्रीडा संकुलात २७ ते २९ जानेवारी ला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडू सहभागी होते. वेदांतने मिळवलेल्या […]

दिलीप पवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित

इगतपुरीनामा न्यूज – महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी दिलीप रोहिदास पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. उपक्रमशील शिक्षक दिलीप पवार हे वाढोली, ता. त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शालेय विकासासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली असून ते उच्चविद्याविभूषित आहेत. महात्मा फुले […]

मिसेस युनिव्हर्स पुरस्कार आणि राष्ट्रीय नारीरत्न पुरस्काराने बिटुर्लीच्या ग्रामसेविका ज्योती शिंदे-केदारे दिल्लीमध्ये सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – एस. के. युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनल आयोजित सिजन २१ मिसेस युनिव्हर्स २०२४ हा किताब इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील ग्रामसेविका ज्योती कमलेश शिंदे- केदारे यांनी पटकावला आहे. यासह सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय नारीरत्न पुरस्कार भाजपा नेते संजय तिटोरिया यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. नोएडा […]

राजू देवळेकर यांना भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार शिर्डी येथे प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू देवळेकर यांना मैत्री संस्था मुंबई, मित्र साई अर्पण फाऊंडेशन व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरवण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना शिर्डी येथे माजी खासदार व साई संस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी सिने […]

error: Content is protected !!