
इगतपुरीनामा न्यूज – गावकामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य इगतपुरी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. इगतपुरी तालुकाध्यक्षपदी कुऱ्हेगावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर धोंगडे पाटील यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी घोटी खुर्दचे कैलास फोकणे यांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके, जब्बार पठाण, विभागीय उपाध्यक्ष किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी संभाजीनगर जिल्हाध्यक्ष कारभारी निगोटे, नाशिक कार्याध्यक्ष महेंद्र भामरे, नाशिक सचिव मुकेश कापडी, नाशिक उपाध्यक्ष रमेश आव्हाड, कार्यकारी अध्यक्ष सुरेश कोकणे, जिल्हा संघटक रोहिदास काळे, महिला प्रतिनिधी भगवती धात्रक, सिन्नर तालुकाध्यक्ष सागर मुठाळ, निफाड कार्याध्यक्ष लक्ष्मण आहेर, वैजापूर तालुकाध्यक्ष राजू आहेर सचिव कदम पाटील आदी मान्यवर हजर होते. इगतपुरी तालुकाध्यक्षपदी कुऱ्हेगावचे ज्ञानेश्वर धोंगडे पाटील, उपाध्यक्षपदी पंकज नवले, सीमा भोर, कार्याध्यक्षपदी सपना देहाडे, कार्यकारी अध्यक्ष गंगाधर पगारे, सचिवपदी रवींद्र पंडित, सहसचिव संजू भगत, खजिनदार अशोक जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया संग्राम हॉटेल, साकुर फाटा इगतपुरी येथे उत्साहात पार पडली. यावेळी इगतपुरी तालुक्यातील बहुसंख्य पोलीस पाटील हजर होते. पोलीस पाटील संघटनेची नोंदणी, ध्येय धोरण, वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके व जब्बार पठाण यांनी मार्गदर्शन केले. ११ डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनाच्या मोर्चासाठी तालुक्यातील पोलीस पाटलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. रविंद्र जाधव पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.जिल्हा उपाध्यक्ष कैलास फोकणे यांनी सूत्रसंचालन तर इगतपुरी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर धोंगडे यांनी आभार मानले.
