महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पुरस्कार वितरण व त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न : इगतपुरी तालुक्याची नूतन कार्यकारिणी घोषित 

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या इगतपुरी तालुका शाखेतर्फे महर्षी पुंजाबाबा गोवर्धने कर्मवीर पुरस्कार, लोकनेते गोपाळराव गुळवे आदर्श शाळा पुरस्कार, राज्याध्यक्ष अंबादासजी वाजे गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. लक्ष्मी लॉन्स गोंदे येथे इगतपुरी तालुक्यातील शिक्षक संघाच्या मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहाट संपन्न झाला. नाशिक जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सोहळ्यासाठी इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झाले, माजी सभापती सोमनाथ जोशी, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, भाजप तालुकाध्यक्ष अण्णा पवार, रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश नाठे, संघटनेचे राज्य सदस्य बाजीराव सोनवणे, शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष पृथ्वीबाबा शिरसाठ, कार्यकारी अध्यक्ष प्रमोद शिरसाठ, जिल्हानेते अर्जुन ताकाटे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पेखळे, कार्याध्यक्ष रवींद्र देवरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख रामदास शिंदे, राष्ट्रीय सल्लागार धनंजय आहेर, जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष धनराज वाणी, एनडीपीटीचे माजी चेअरमन उमेश बैरागी, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती नाठे, कोषाध्यक्ष शांताराम काकड, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाजीराव कमानकर, जिल्हा आघाडीच्या महिलाध्यक्ष संगीता पवार , जिल्हा उपाध्यक्ष दिलीप धांडे, सिन्नर तालुकाध्यक्ष संजय भोर, दिंडोरी तालुकाध्यक्ष सचिन वडजे, सरचिटणीस योगेश बच्छाव, नाशिक तालुका सरचिटणीस सुभाष भदाणे, किरण सोनवणे, शिक्षक पतसंस्था माजी चेअरमन तुकाराम सारुक्ते, भिला अहिरे, मनोहर आव्हाड, वरंदळ आप्पा, साहेबराव अहिरे, समाधान हिरे, अंकुश सहाणे, हरिश्चंद्र जाधव, खगेश जाधव यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व शाळांना उपयुक्त ठरणाऱ्या शिक्षक संघाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

इगतपुरी तालुक्याचे पहिले आमदार व भात लढ्याचे  प्रणेते महर्षी पुंजाबाबा गोवर्धने यांच्या नावाचा कर्मवीर पुरस्कार प्रा. मनोहर घोडे (धार्मिक), डॉ. महेंद्र शिरसाठ ( वैद्यकीय ), संदीप सुधाकर कोतकर ( पत्रकारिता ) किरण प्रभाकर फलटणकर ( सामाजिक ), कु. प्रतिभा भास्कर सारुक्ते ( क्रीडा ), भूमिपुत्र फाउंडेशन ( संस्था ), लोकनेते गोपाळराव गुळवे आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा गव्हांडे, वाळविहीर, उंबरकोन, घोटी बुद्रुक वाडी, अधरवड, गिरंगेवाडी, नांदगाव बुद्रुक, राज्याध्यक्ष अंबादास वाजे गुणवंत शिक्षक पुरस्कार संजय येशी फांगुळ गव्हाण, जगदीश खैरनार उभाडे, विजय छोटू भदाणे मानवेढे, राजाराम पोपट सावकार वडाचीवाडी, विजय शिवाजी सहाणे पिंपळगाव भटाटा, बाळासाहेब बबन टोचे टाकेद, दगडूसिंग प्रल्हादसिंह परमार भरवज, माया काशिनाथ अहिरे निनावी, सोमनाथ अशोक सोनवणे माणिकखांब  यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. शिक्षक संघाचे राज्य निरीक्षक बाजीराव सोनवणे व जिल्हा निरीक्षक प्रदीप पेखळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विषय नियामक सभेमध्ये पुढील तीन वर्षासाठीची नूतन कार्यकारणी निवड यावेळी जाहीर करण्यात आली. तालुका नेते श्रीकांत निकम, तालुकाध्यक्ष विनायक पानसरे, तालुका कार्यकारी अध्यक्ष ज्ञानेश्वर बांगर, सरचिटणीस दीपक भदाणे, कार्याध्यक्ष विवेक आहेर व दीपक पगार, कोषाध्यक्ष विजय सहाणे, कार्यालयीन चिटणीस संतोष शिरसाठ, चिटणीस दत्ता खुर्दे, सल्लागार शरद यादव, संपर्कप्रमुख राजेश खैरनार व लालू गारे,.महिला आघाडी तालुका नेते प्रेमलता चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष माधुरी पाटील, कार्यकारी अध्यक्ष सुवर्णा म्हस्के, सरचिटणीस सुशीला चोथवे, कार्याध्यक्ष आशा पानसरे, चंद्रकला राहणे, कोषाध्यक्ष पल्लवी गवांदे यांचा नूतन कार्यकारिणीत समावेश आहे. अवधूत खाडगीर यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!