
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या इगतपुरी तालुका शाखेतर्फे दरवर्षी महर्षी पुंजाबाबा गोवर्धने कर्मवीर पुरस्कार, लोकनेते गोपाळराव गुळवे आदर्श शाळा पुरस्कार, राज्याध्यक्ष अंबादासजी वाजे गुणवंत शिक्षक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार जाहीर झाले असून २७ डिसेंबरला गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्स येथे इगतपुरी तालुक्यातील शिक्षक संघाच्या मेळाव्यात पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती इगतपुरी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष विनायक पानसरे, शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती नाठे एनडीपीटीचे माजी चेअरमन उमेश बैरागी यांनी दिली. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची पुनर्रचना होणार असून शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार आहे.
इगतपुरीचे पहिले आमदार व भात लढ्याचे प्रणेते महर्षी पुंजाबाबा गोवर्धने यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या कर्मवीर पुरस्कारासाठी इगतपुरी तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली. महर्षी पुंजाबाबा गोवर्धने कर्मवीर पुरस्कार प्रा. मनोहर घोडे (अध्यात्म ), डॉ. महेंद्र शिरसाठ ( आरोग्य), पत्रकार संदीप कोतकर ( पत्रकारिता ), प्रशांत नारायण कडू ( समाजकार्य ), किरण फलटणकर (राजकारण), कु. प्रतिभा सारुक्ते ( क्रीडा ), भूमिपुत्र फाउंडेशन( संस्था ) यांना पुरस्कार जाहीर झाले आहे. लोकनेते गोपाळराव गुळवे आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा गव्हांडे, वाळविहीर, उंबरकोण, घोटी बुद्रुक वाडी, अधरवड, गिरंगेवाडी, नांदगाव बुद्रुक या शाळांना देण्यात येतील. राज्याध्यक्ष अंबादास वाजे गुणवंत शिक्षक पुरस्कार संजय येशी फांगुळ गव्हाण शाळा, जगदीश खैरनार उभाडे शाळा, विजय छोटू भदाणे मानवेढे शाळा, राजाराम पोपट सावकार वडाचीवाडी शाळा, विजय शिवाजी सहाणे पिंपळगाव भटाटा, बाळासाहेब बबन टोचे टाकेद शाळा, दगडूसिंग प्रल्हादसिंह परमार भरवज शाळा, माया काशिनाथ अहिरे निनावी शाळा, सोमनाथ अशोक सोनवणे माणिकखांब शाळा यांना दिले जाणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष पृथ्वीबाबा शिरसाठ जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे, माजी जिल्हा नेते अर्जुन ताकाटे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पेखळे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती नाठे, एनडीपीटीचे माजी चेअरमन उमेश बैरागी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले, निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, मविप्र संचालक संदीप गुळवे माजी जि. प. सदस्य हरिदास लोहंकरे, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, गोपाळा लहांगे, सोमनाथ जोशी, शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.