इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रतिवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ही परंपरा कायम ठेवत यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा मंडळातर्फे करण्यात आली आहे . यावर्षी ‘जीवन गौरव’ पुरस्कार – नानासाहेब बोरस्ते यांना, ‘सर्वतीर्थ ‘पुरस्कार – ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांना तर ‘वारकरी भूषण ‘पुरस्कार- हभप अशोक महाराज धांडे यांना जाहीर करण्यात आला […]
इगतपुरीनामा न्यूज – २२ ते २४ जानेवारीला इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकांऊटन्टस ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे ज्ञानोत्सव विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी परिषदेचे नियोजन गुजरात येथील बडोदा चॅप्टरतर्फे करण्यात आले. या परिषदेत पश्चिम विभागातील गोवा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई व नाशिक चॅप्टर तर्फे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. […]
इगतपुरीनामा न्यूज – ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. उद्या प्रजासत्ताकदिनी सुरेश मनोरे यांना सन्मानपूर्वक पदक देऊन गौरव होणार आहे. विशेष पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी यापूर्वी घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात […]
ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आणि व्ही डी के स्पोर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात दोन दिवसीय सब ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ७, ८,१२, १४ आणि १६ वर्ष वयोगटातील मुले आणि मुली वयोगटाचा समावेश होता. यामध्ये त्र्यंबकराज ॲथॅलेटिक ग्रुपने आपला दबदबा कायम […]
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी दशरथ जमधडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी आज त्यांच्या निवडीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे खंदे समर्थक म्हणून दशरथ जमधडे इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेतर्फे दरवर्षी इगतपुरी तालुक्यातील सामाजिक, शिक्षण क्षेत्र व आदर्श शाळांचा सहावा सन्मान सोहळा गोंदे येथे संपन्न झाला. इगतपुरीचे पहिले आमदार महर्षी पुंजाबाबा गोवर्धने यांच्या स्मरणार्थ कर्मवीर पुरस्कार व महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष कै. अंबादास वाजे यांच्या स्मरणार्थ गुणवंत शिक्षक पुरस्कार व शिक्षक संघाचे नेते […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाशिक जिल्हा शाखेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील जामुंडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते कार्यभार पाहत आहेत. प्राथमिक शिक्षक समिती राज्य अध्यक्ष काळुजी बोरसे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी राज्य कोषाध्यक्ष केदु देशमाने, राज्य उपाध्यक्ष आनंदा […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी तालुका शाखेतर्फे दरवर्षी सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्ती आणि आदर्श शाळांचा सन्मान जानेवारीत केला जातो. या वर्षात तदेण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा तालुका कार्यकारिणीने केली असून शनिवारी ११ जानेवारीला लक्ष्मी लॉन्स गोंदे येथे खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर आदींच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. गणेश […]
इगतपुरीनामा न्यूज – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंटस ऑफ इंडिया ( आयसीएमएआय ) तर्फे डिसेंबरला घेण्यात आलेल्या फाऊंडेशन परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. नाशिक चॅप्टरच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत १६१ विद्यार्थ्यांपैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अदिती कटाळे हिने २९८ गुण मिळवत नाशिकमध्ये प्रथम क्रमांक […]
इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री माझी शाळा नाशिक तालुका प्रथम आलेल्या विल्होळी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेने पीएमश्री जिल्हा परिषद अध्यक्ष चषकमध्ये घवघवीत यश प्राप्त केले. विल्होळी शाळेने सर्व स्पर्धामध्ये भाग घेत प्रथम क्रमांकाचे १४ व द्वितीय क्रमांकचे २ व तृतीय क्रमांकाचे २ अशी बक्षिसे पटकावली सर्व जिल्हा परिषद बिटस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा विल्होळी […]