भावली खुर्दच्या उपसरपंचपदी योगेश आगिवले यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – भावली खुर्द येथील उपसरपंच कै. दौलत भगत यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची आज निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश बाळू आगिवले यांची बिनविरोध निवड झाली आहे.  सरपंच जिजाबाई एकनाथ आगिवले यांनी अध्यासी अधिकारी काम पाहिले. ग्रामसेविका रुपाली जाधव यांनी त्यांना सहाय्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ कमळु आगिवले, यशवंत देवराम झुगरे, भीमाबाई राजाराम तेलम, मथुरा सुरेश तेलम, दुर्गाबाई जगन्नाथ आगिवले, रेणुका मधुकर तेलम, चांगुणा बबन आगिवले उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच सरपंच जिजाबाई एकनाथ आगिवले, पोलीस पाटील जगन्नाथ मोहन आगिवले, ग्रामस्थ सुरेश रामाजी तेलम, खेमचंद कमळू आगिवले, मधुकर तेलम, भारत आगिवले, बबन आगिवले, संतोष बाळू आगिवले, चंद्रकांत आगिवले आदी ग्रामस्थांनी जल्लोष केला. नूतन उपसरपंच योगेश बाळू आगिवले यांचे इगतपुरी तालुक्यातून अभिनंदन सुरु आहे.

Similar Posts

error: Content is protected !!