प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेतर्फे ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे शाळेमध्ये महात्मा गांधी जयंती व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्हिजन कार्यपूर्तीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, संस्थेचे सचिव ज्योती कोल्हे, मुख्याध्यापिका सुरेखा आवारे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नागोसली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ROHS Certification Pvt Ltd संस्थेने मानांकनापूर्वी ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, ग्रामपंचायतीचे नियमित दप्तर व आर्थिक तपासणी (ऑडिट), ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाडी, शैक्षणिक सेवा सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य आदींची पाहणी करून गुणांकन ठरविले. ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून गावाचा […]
इगतपुरीनामा न्यूज – धामणीच्या उपसरपंचपदी महेंद्र पगारे यांची बिनविरोध निवड झाली. स्वराज्यचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, माजी उपसरपंच गौतम भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली. याप्रसंगी ग्रामसेवक शरद केकाणे, सरपंच बन्सी गोडे, सुरेश गांगड, रंजना लाड, रोहिणी घोटे, बाळू जाधव, नंदा उघडे, विनायक लाड, रंजना आगिवले , राजेंद्र भोसले, नंदू पगारे, उपस्थित होते. ईश्वर भोसले, मनोज […]
शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेत इगतपुरी वाडीवऱ्हे येथील वैभव दिलीप कातोरे यांनी उज्वल यश मिळवले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून असणाऱ्या वैभवने शेतीसह शिक्षणाला महत्व देऊन परिश्रम घेतले. यामुळे देशांतर्गत क्रिकेट सामन्यात पंच म्हणून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील १९७ उमेदवारांमधून वैभव दिलीप कातोरे याने ९६ टक्के […]
इगतपुरीनामा न्युज – विविध शासकीय योजना प्रशिक्षणाद्वारे पोहचविण्याचे कार्य अमळनेर राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशनचे मुख्य प्रशिक्षक तथा बाळकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष कैलास चौधरी करतात. त्यांच्या कार्याची दखल रंग साहित्य कला प्रेरणेने घेतली आहे. त्यांना द ग्रेट इंडियन आयकॉन अवॉर्डची घोषणा शामरंजन फाउंडेशनने केली. कला व संस्कृती विभाग गोवा, स्मित हरी प्रॉडक्शन, शामरंजन फाउंडेशनतर्फे मुंबईत रविवारी […]
इगतपुरीनामा न्यूज – कावनई विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक अविरोध पार पडली. चेअरमनपदासाठी खंडेराव पाटील यांचा एकमेव अर्ज आला. तर व्हाईस चेअरमन पदासाठी राजाराम शेलार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सैंदाणे यांनी ही निवड बिनविरोध घोषित केली. खंडेराव पाटील यांची चेरमनपदी निवड झाली तर व्हाईस चेरमनपदी राजाराम शेलार […]
इगतपुरीनामा न्यूज – भारतीय संस्कृती आणि राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे मोलाचे योगदान असून गुरूला सन्मान देणाऱ्या परंपरेची जोपासना केली जाते. त्यानुसार रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम हॉटेल करी लिव्हज येथे मोठ्या दिमाखात पार पडला. अभय मुजुमदार यांनी सर्वांचे स्वागत केले. रोटरी क्लब […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो येथील रोहित अशोक सोनवणे याची मुंबई शहर पोलीस दलात नव्याने नियुक्ती झाली असून तो गावाचा प्रथम पोलीस ठरला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी ग्रामस्थांतर्फे त्याचा सन्मान केला. जिल्हा परिषद मराठी माध्यम शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे वडील अशोक किसन सोनवणे, आई अरुणा अशोक सोनवणे यांनाही […]
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी इगतपुरी तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसपासून ते युवक काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केलेले उमेश खातळे यांच्या कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटकपदी त्यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी मेहबूब शेख उपस्थित होते. उमेश खातळे […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो गावाचे शेतकरी अशोक किसन सोनवणे, अरुणा अशोक सोनवणे यांचे चिरंजीव रोहित अशोक सोनवणे यांची मुंबई शहर पोलीस या ठिकाणी निवड झाली आहे. ही बातमी समजताच पिंप्री सदो गावातील त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. सर्वांनी रोहितला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पिंप्री सदो गावाच्या इतिहासात रोहित हा पहिला […]