गोरगरिबांना न्याय देणारे पत्रकार शैलेश पुरोहित यांना जनसेवा प्रतिष्ठानचा “स्वामी गौरव” पुरस्कार : उद्या इगतपुरीत होणार पुरस्कार वितरण सोहळा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील श्री स्वामी समर्थ मंडळ आणि जनसेवा प्रतिष्ठानतर्फे पत्रकारितेवर प्रभुत्व असलेले आदर्श पत्रकार शैलेश पुरोहित यांना “स्वामी गौरव” पुरस्कार घोषित झाला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांनी याबाबत माहिती दिली. उद्या गुरुवारी दुपारी अडीच वाजता आर. जी. चांडक माहेश्वरी मंगल कार्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारितेची कोणतीही पार्श्वभुमी नसलेल्या सामान्य कुटुंबात शैलेश पुरोहित यांचा जन्म झाला. गोरगरीब आदिवासी  बांधव आणि जनसामान्य लोकांच्या प्रश्नांशी त्यांची नाळ जुळली. गेल्या १० वर्षापासून बदललेल्या पत्रकारितेशी त्यांनी समरसता ठेवीत नामवंत आणि आघाडीच्या वृत्तपत्रांतुन पत्रकारिता केली. सध्या ते TV9 चॅनेलमध्ये काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या लेखणीतून वंचित समाजघटक, आदिवासी, श्रमजीवी, कष्टकरी, दुर्बळ घटक यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून ते लीलया सोडवले. या जनसामान्यांच्या पत्रकाराच्या लेखणीने आदरयुक्त दहशत निर्माण केली. परिपूर्ण अभ्यास करून त्यांनी अडल्या नडल्या लोकांना भरीव मदत करीत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता त्यांनी निरंतर आपलं कार्य नेटाने सुरु ठेवलं आहे. मातीत रुजलेला हा पत्रकार सर्व समाजासाठी मार्गदर्शक ठरला. “स्वामी गौरव” पुरस्काराने त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन सुरु आहे. नुकतेच राजयोग प्रतिष्ठानतर्फे त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आलेला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!