वाकी बिटूर्लीच्या ग्रामसेविका ज्योती केदारे मिसेस दुबई इंटरनॅशनल क्लासिक अवॉर्डने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – दुबई येथे पार पडलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय ब्युटी सेमिनार व ब्युटी टॅलेंट शो अंतर्गत ब्युटी टॅलेंट शो मध्ये नासिक जिल्ह्यातील वाकी बिटूर्ली ता. इगतपुरी येथील ग्रामसेविका ज्योती कमलेश केदारे – शिंदे यांना मिसेस दुबई इंटरनॅशनल क्लासिक अवॉर्ड २०२३ ने मिसेस दुबई २००९ यांच्या हस्ते व सनशाईन ब्युटी अकादमीच्या संचालिका विनी कौर राजपुर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातूनच दुबईमधील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातुन टॅलेंट शोमध्ये मिसेस दुबई इंटरनॅशनल क्लासिक २०२३ हा पुरस्कार ज्योती केदारे शिंदे यांनी पटकावत विदेशात आपल्या नशिक जिल्ह्याची शान राखत बहुमान मिळवला. त्या ग्रामसेविका पदावर कार्यरत असून समाजसेवा, शासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा त्या उमटवत आहेत. या सगळ्या यशामागे त्यांचे पती कमलेश शिंदे, कुटुंबीय असल्याचे त्या सांगतात. हा पुरस्कार समाजातील सर्व महिलांना समर्पित करत समाजात महिलांना कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नये व आपल्या कार्याचा ठसा उमटवा असे त्या म्हणाल्या.

त्यांनी महिला सक्षमीकरण, बालविवाह, कुपोषण निर्मुलन, बचतगट सक्षमीकरण, महिलांना रोजगार प्रशिक्षण, अशा अनेक क्षेत्रात उत्तम काम केल्याने त्यांना अन्याय अत्याचार निर्मूलन समिती (उ. म) यांचा समाजिक पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, राष्ट्रस्तरीय आदर्श नारीरत्न पुरस्कार इगतपुरी साहित्य मंडळाचा समाजमित्र पुरस्कार, संजीवनी फाउंडेशनचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार, मिरेकल इटस्टचा फेस (face) ऑफ महाराष्ट्र पुरस्कार, लोकमतचा ग्रामविकासाचे शिल्पकार, लोकमतचा ” The elitest “पुरस्कार व आत्ताच दुबई येथे  मिसेस दुबई इंटरनेशनल क्लासिक अवॉर्ड २०२३ मिळाल्याने अनेक स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे. ग्रामसेवक संघाचे नाव विदेशात उंचावल्याने ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम यांनी अभिमान व्यक्त केला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!