त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक संपन्न : पत्रकार ज्ञानेश्वर महाले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : किरण चौधरी यांची त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षपदी निवड

इगतपुरीनामा न्यूज – कामाचा माणूस, हक्काचा माणुस असलेले उपमुख्यमंत्री ना. अजित पवार ओळखले जातात. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचा सर्वागिण विकास करण्यासाठी राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत गोरख बोडके बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष बहिरु मुळाणे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, गोकुळ बत्तासे, किरण चौधरी, योगेश देवरगावकर, पत्रकार ज्ञानेश्वर महाले, देवा बेंडकोळी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून जनसेवा करणारे पत्रकार ज्ञानेश्वर महाले यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश माजी आमदार शिवराम झोले यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वर महाले यांना लवकरच संघटनात्मक जबाबदारी देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी घोषित केले.

यावेळी किरण चौधरी यांची त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात आली. कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, माजी आमदार शिवराम झोले, योगेश निसाळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बैठकी प्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, तालुकाध्यक्ष बहिरु मुळाणे, युवक जिल्हाध्यक्ष 
योगेश निसाळ यांनी मार्गदर्शन केले. भास्कर मेढे, दिलीप ढेरिंगे, गोकुळ बत्तासे, योगेश देवरगावकर, युवक तालुका उपाध्यक्ष अमोल वाघमारे, तुकाराम महाले, केरु आहेर, हिमांशु देवरे, अरुण शिरसाठ, योगेश तिदमे, गणेश मुळाणे, पंडित घुले, अमोल वाघमारे, रंगनाथ महाले, अनिल बोडके, रामचंद्र झोले, वसंत ढोंगे, शिवा गुंड, अभि कोठुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!