दारणा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शुक्रवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील समनेरे येथे दारणा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शुक्रवार दि. १५ रोजी ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवशाही संघटनेचे अध्यक्ष तथा आयोजक ॲड. रोहीत उगले यांनी ही माहिती दिली. यावेळी पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या समनेरे गावच्या प्रथम महिला पोलीस कु. अश्विनी जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र बाळासाहेब फलटणे असणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून शिवशाही संघटनेचे पदधिकारी गोकुळ पाचरणे, पदमाकर कडु, विष्णु कोकणे, मनोज पथवे, गोविंद हाडप उपस्थित राहणार आहेत अशी माहिती स्वागतोत्सुक बंटी उगले यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!