यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे हा जीवनाचा मुलमंत्र असावा – प्रा. डॉ. स्मिता सोनवणे : चिंतामणी बहुउद्देशीय संस्थेतर्फे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थी जीवनात प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम घेऊन ध्येय निश्चित केल्यास यश प्राप्त होते. गुणवत्तेला कार्यक्षमतेची जोड देऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज हितासाठी करावा. संघर्ष केल्याशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होणार नाही. पराजयात मोठ्या विजयाची नांदी लपलेली असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे हा जीवनाचा मुलमंत्र असला पाहीजे असे प्रतिपादन व्ही. एन. नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. स्मिता सोनवणे यांनी केले. चिंतामणी बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्यावतीने नाशिक शहरातील नाभिक समाजाच्या इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला. गंगापूर रोड नाशिक येथील चिंतामणी मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनवणे बोलत होत्या. नाभिक समाज बांधवांचे विविध क्षेत्रात मोठे योगदान असून यापुढेही ह्यामध्ये नव्या पिढीने कार्यरत असायला हवे असे त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान केले.

कार्यक्रमावेळी डेल्टा मॅग्नेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश निकम यांनी जीवनात कधीही हताश होऊ नका. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर परमेश्वराचा कृपा, आशीर्वाद मिळतोच, यश प्राप्त होतेच. जीवनात खरे बोला, दररोज नवीन शिकत जा. मोठी स्वप्न पहा व कष्ट करून स्वप्न पूर्ण करा असे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आहेर, चिंतामणी गुणगौरव समितीच्या अध्यक्षा मनीषा शिंदे यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. ह्या गुणगौरव सोहळ्यात इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या २०० विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १८ समाज बांधवांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास राऊत, देवकीनंदन निकम, राजेंद्र देसाई अरुण बोरसे, अविनाश लोखंडे, बाळासाहेब कारले, नितीन कोरडे, भगीरथ बिडवे, प्रकाश जाधव, भाऊसाहेब आंबेकर, भारती सोनवणे, सिद्धी महाले, अर्चना राऊत, देवयानी भदाणे, सुनंदा वाघ आदींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना संत व लक्ष्मीकांत संत यांनी केले. आभार प्रदर्शन देवयानी भदाणे यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!