इगतपुरीनामा न्यूज – श्री स्वामी समर्थ मंडळ व श्री जनसेवा प्रतिष्ठान, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी येथे गुरुवारी गुणवंत विद्यार्थी गुण गौरव आणि स्वामी गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असून घोटी मर्चंट बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान होणार आहे. उद्या गुरुवारी २४ ऑगस्टला दुपारी २.३० वाजता आर. जी. चांडक माहेश्वरी मंगल कार्यालय, गांधी चौक, इगतपुरी हा सोहळा होणार आहे. ह्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ मंडळ व श्री जनसेवा प्रतिष्ठानतर्फे किरण फलटणकर यांनी केले आहे. कार्यक्रमामध्ये जागृत नाशिक जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्री कंठानंद यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी घोटी मर्चंट बँक, डॉ. हेडगेवार पतसंस्था, रावत फांउडेशन, श्री माहेश्वरी बालाजी मंदिर ट्रस्ट, झेड. आर. नावंदर चॅरीटी ट्रस्ट, कै. अनिल – सुनिल खंडेलवाल ( रावत) चॅरीटेबल ट्रस्ट यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी राहणार असून भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून नाशिकचे महसूल चिटणीस परमेश्वर कासुळे, इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर, पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, मुख्याधिकारी पंकज गोसावी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी घोटी मर्चंट बँकेचे अध्यक्ष दिपक चोरडीया, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे सहा. निरीक्षक सचिन बनकर, डॉ. हेडगेवार पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन बबेरवाल, बाजार समितीचे आणि घोमकोचे सर्व संचालक, सर्व मुख्याध्यापक, सर्व पक्षांचे तालुकाध्यक्ष, आजी माजी नगरसेवक असणार आहेत.
श्री स्वामी गौरव पुरस्कार २०२३ चे पुरस्कारार्थी
आदर्श पत्रकार पोपट कारभारी गवांदे, शैलेश शामसुंदर पुरोहित, विकास भास्कर काजळे, आदर्श शिक्षक विजय शंकर पगारे, निवृत्ती सखाराम तळपाडे, एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान रामा मधे, आनंद मधुकर बर्वे, निता सुरेश वारघडे, तुकाराम सखाराम वारघडे, ॲड. प्रेमसुख रामचंद्र चांडक, अनंत महादेव पासलकर, योगेश संजय चांदवडकर, सत्तार इस्माईल मणियार, डॉ. नरेंद्र दिपचंद सेठी, नंदकुमार विठ्ठल भोंडवे, उपक्रमशील आदर्श शाळा लिटल ब्लॉसम स्कूल