देविदास नाठे यांची गटसचिव संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा गटसचिव व कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र देवीदास नाठे यांची बिनविरोध निवड झाली आहेत. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत ही निवड घोषित करण्यात आली.देविदास नाठे यांचे जिल्ह्यातील सर्व सचिवांकडुन अभिनंदन करण्यात आले. निवड झाल्यानंतर सचिव संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, मालेगावचे भिला निकम, सिन्नरचे किरण गोसावी, […]

जन्म दाखला ठरतोय “आधार” मध्ये अडसर! : भटका समाज आणि आदिवासी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचा धोका

इगतपुरीनामा न्यूज : आधार कार्ड धोरणांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलांमुळे आता नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी जन्म दाखला पुरावा जोडणे बंधनकारक आहे. जन्म दाखल्याशिवाय अन्य कुठलाही पुरावा यासाठी ग्राह्य मानला जात नाही. यापूर्वी जन्म दाखला नसला तरी केवळ रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सुध्दा नवीन आधार कार्ड नोंदणी करणे शक्य होते, मात्र या वर्षी […]

ढेकळात घाम गाळणाऱ्या शेतकरीपुत्राची गगनभेदी झेप : इगतपुरी तालुक्याचा “भूषण” यशाच्या शिखरावर

लेखक – सीएमए अमित जाधवउपाध्यक्ष, नाशिक चॅप्टरदि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया नाशिक चॅप्टरचे मावळते अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करायचं ठरलं तर हा प्रवास त्यांना बऱ्याच गोष्टींचा अनुभव देऊन जाणारा ठरला. जेव्हा एखादा विद्यार्थी सीएमए ह्या प्रोफेशनल डिग्रीला एडमिशन घेतो तेव्हा तर त्याला नक्कीच इन्स्टिट्यूटमध्ये चॅप्टर लेव्हलला लीड करण्याची संधी […]

संजीवनी आश्रमशाळेचा दहावीचा निकाल 85 टक्के

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. राजेंद्र गोविंद दासरी याने 74.80 टक्के गुण मिळवून आश्रम शाळेत प्रथम क्रमांक, सावन सुरेश माळी याने 71.80 गुण मिळवून द्वितीय तर लीना दिनेश गोसावी हिने 69.80 टक्के गुण मिळवून आश्रम शाळेमधून तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या […]

वारकऱ्यांचे लाडके वै. शत्रुघ्न महाराज गतीर – इगतपुरी तालुक्यातील अनमोल रत्न पांडुरंगचरणी विलीन

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा पवित्र ते कुळ पावन तो देशजेथे हरिचे दास जन्म घेतीअसे सर्वच संतांचे सिद्ध झालेले प्रमाण आहे. ह्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका सुद्धा मागे नाही. ह्या तालुक्यात विविध रत्नांची खाण आहे. ह्यापैकी अत्यंत महत्वाचे अनमोल असणारे एक रत्न हभप शत्रुघ्न महाराज महादु गतीर हे १ एप्रिल २०२३ ला वैकुंठवासी झाले. […]

ज्ञानदानाचे महर्षी “गिरी”तुल्य व्यक्तिमत्व प्रा. देविदास गिरी : चार दशकामध्ये महाराष्ट्रात घडवली गुणवंतांची सुसज्ज फौज

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक अन्नदानं पर दानं विद्यादानमत: परम् ।अन्नेन क्षणिका तृप्ति: यावज्जिवं च विद्यया ॥अन्नदानामुळे भुकेल्या व्यक्तीला अल्पकाळाची तृप्ती मिळते. मात्र मिळालेल्या योग्य विद्यादानामुळे प्रत्येकाला आयुष्यभराची सुख समृद्धी मिळते. याच प्रकारे आयुष्याच्या जवळपास चार दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे “गिरी”तुल्य व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. देविदास गिरी…सर्वांगीण क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास, भाषेवर जबरदस्त प्रभुत्व, कौशल्यदायी […]

इगतपुरी तालुक्याची पहिली महिला कीर्तनकार “कु. पौर्णिमा” : खडकवाडीतील संस्कारांचे मोती भाविकांच्या सेवेत

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज “ओलें मूळ भेदी खडकाचें अंग | अभ्यासासी संग कार्यसिध्दी” ह्या अभंगाद्वारे असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करतात. त्या अभंगाचा सारांश असा आहे की,  दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. विष पचायला अत्यंत कठीण असते पण हेच विष सातत्याने थोडे थोडे […]

इगतपुरी तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी तालुक्यातील टिटोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवोपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव भटाटा, भावली खुर्द, कुरुंगवाडी यासारख्या अतिशय दुर्गम गावात त्यांनी प्रभावी काम केले आहे. विद्यार्थ्यांतील […]

प्रहार सैनिक कल्याण संघाचे इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार जाहीर : शिदवाडी येथे रविवारी १ जानेवारीला होणार पुरस्कार वितरण सोहळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – प्रहार सैनिक कल्याण संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रात बहुमोल कामगिरी करून मोठे योगदान देणाऱ्या गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी १ जानेवारीला इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथे शहीद राजेंद्र भले स्मारक प्रांगणात इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कारात सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पत्रकार, राजकीय, […]

इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला दीड कोटी रुपयांचे बक्षीस : राज्यस्तरीय पृथ्वी घटकांतर्गत उत्कृष्ट कामगिरी आणि नाशिक विभागस्तरीय प्रथम बक्षीस घोषित

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पृथ्वी घटकांतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी ७५ लाख आणि नाशिक विभागस्तरीय प्रथम कामगिरीसाठी ५० लाख असे तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस घोषित झाल्याची घोषणा शासनाने केली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी […]

error: Content is protected !!