ढेकळात घाम गाळणाऱ्या शेतकरीपुत्राची गगनभेदी झेप : इगतपुरी तालुक्याचा “भूषण” यशाच्या शिखरावर

लेखक – सीएमए अमित जाधव
उपाध्यक्ष, नाशिक चॅप्टर
दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया

नाशिक चॅप्टरचे मावळते अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करायचं ठरलं तर हा प्रवास त्यांना बऱ्याच गोष्टींचा अनुभव देऊन जाणारा ठरला. जेव्हा एखादा विद्यार्थी सीएमए ह्या प्रोफेशनल डिग्रीला एडमिशन घेतो तेव्हा तर त्याला नक्कीच इन्स्टिट्यूटमध्ये चॅप्टर लेव्हलला लीड करण्याची संधी मिळेल असं कधी वाटत नसतं. परंतु योग्य दिशा आणि दृष्टिकोण ठेवला तर सगळं शक्य असते. सीएमए ह्या प्रोफेशनल डिग्रीमुळे करियरला वेगळं वळण मिळते आणि तसेच आजपर्यंत लाखो सीएमए इन्स्टिट्यूट मधून तयार झाले आणि आज त्यांच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे ते ह्या पदवीमुळेच…खेडेगावातील विद्यार्थ्यांमध्ये आपण शहरातल्या विद्यार्थ्यांना मॅच करू शकणार नाही हा एक न्यूनगंड असतो तसंच काहीतरी भूषण पागेरे यांना पण वाटत होतं, याशिवाय करियरमध्ये पुढे काय संधी आहेत याबद्दल कल्पना देखील नव्हती. तसेच त्यांचा वयक्तिक दुसरा महत्वाचा विषय असा होता की दहावीला अगदीच जेमतेम स्कोर असल्याने मी काही करू शकतो की नाही याबद्दल त्यांचा आत्मविश्वास मनोबल खच्ची करत होता. गावाकडे शिक्षणाची सोय नसल्याने भगूर येथें पहिली ते बारावी नूतन विद्यामंदिर येथे तसेच आणि देवळाली कॅम्प येथे बारावी ते बी. कॉम असं शिक्षण भगूरला मामाच्या घरी राहून पूर्ण केलं. शिक्षण चालू होतं त्यादरम्यान दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत  गावाकडे जाऊन शेतीकामात मदत करणे प्रसंगी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करणे अशी कामे करायची अश्या तऱ्हेने बी. कॉम पर्यंतचा प्रवास पूर्ण झाला.

बी. कॉम नंतर काय यावर काही मित्रमंडळी आणि अनुभवी शिक्षक यांच्याकडून पुढे काय याबद्दल त्यांनी माहिती मिळवली त्यांनतर पुढे सीएमए (त्यावेळचं आयसीडब्ल्यूए) करण्याचा विचार देखील केला. खरंतर सीएमए (आयसीडब्ल्यूए) नक्की काय आहे हे घरच्यांना देखील माहीत नव्हतं, तरी घरून आई वडिलांकडून योग्य वाटेल तो निर्णय घेण्याची  मोकळीक मिळाली. शिक्षण मराठी मिडीयम मधून झालेले असल्याने प्रचंड मेहनती घ्यावी लागली, एकतर इंग्रजी वाचायची अन त्यानंतर समजून घ्यायची सवय नव्हती म्हणून सीएमएचा अभ्यास करायला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आणि पदवी मिळवली आणि सीएमए झाल्यानंतर पदवीचा उपयोग चांगल्या लेव्हलला पोहोचण्यास झाला. त्यांनंतर त्यांनी काही वर्ष इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव घेतला आणि सीएमएबद्दल अवेरनेस नाही म्हणून काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छाशक्ती त्यांना अस्वस्थ करत होती, म्हणून तज्ञांचा सल्ला घेतला व त्यांनंतर चॅप्टरच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये ऑफिशियली येऊन काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला… २०१७ ते २०२३ सलग सहा वर्षे २ टर्म पूर्ण केल्या. उल्लेखनीय कामाची दखल घेऊन २०२२-२३ या शेवटच्या वर्षकरिता त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती इतर सदस्यांनी केली, संधीचं सोनं कसं करता येईल यावर भर दिला. वर्षभरात विद्यार्थी आणि सदस्य यांच्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबवले गेले झाले, प्रिंट मिडियामध्ये सीएमएबद्दल जनजागृती करण्याचं काम केलं, वर्षभरात जवळपास १३० हुन अधिक बातम्या छापून आल्या तसेच वेगवेगळ्या कॉलेजला जाऊन विद्यार्थ्यांना करीयर मार्गदर्शन झाले. त्यांच्यासमोर अध्यक्षपदाची जबाबदारी पुण्यात राहून थरमॅक्स कंपनीतला जॉब सांभाळून पार पाडणं हे आव्हान होतं आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं.

Similar Posts

error: Content is protected !!