लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरी तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यांत शिक्षणाची दारणामाई ज्यांच्यामुळे वाहत आहे असे इगतपुरी तालुक्याचे अग्रणी शिक्षणमहर्षी लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांचे वारसदार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांचा मविप्र संचालकपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी ऐतिहासिक विजय झाला. अनेक संकटे, दबा धरून बसलेले विरोधक, अनेक कारस्थाने आदींच्या नाकावर टिच्चून ॲड. संदीप […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ विकासाचे पर्व, सामाजिक एकता, सुंदर गाव, सुंदर विचारांची माणसे आणि सुंदर इमारती अशी विविधांगी वैशिष्ट्य असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावाच्या शिरपेचात आणखी एक तुरा लागणार आहे. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आर. आर. ( आबा ) पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत पुरस्कार मोडाळे गावाला घोषित झाला आहे. उद्या स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे होणाऱ्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या कोरोनाकाळातील कामगिरीबाबत सातत्याने अनेकांकडून माहिती दिली जात होती. याबाबत त्यांची भेट झाल्यावर त्यांचे विशेष कौतुक केले होते. अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला पुरस्काराने सन्मानित करतांना अत्यानंद होत आहे. आदिवासी समाज बांधव आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी कोविड काळात 24 उपलब्ध असणारे गोरख बोडके सन्मानाला पात्र आहेत असे […]
अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये भास्करराव कदम गुरुजी यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त हा शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी लिहिलेला विशेष लेख इथे देत आहोत…. शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः।वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा॥शूरवीर असा मनुष्य शंभरातून एखादा जन्मतो, विद्वान मनुष्य हजारातून एखादा, उत्कृष्ट वक्ता दहा हजारांतून एखादा जन्मतो. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीतील युवतीच्या खून प्रकरणी तिच्या मेहुण्याचा कांगावा वेळीच ओळखल्यामुळे १५ ते २० कुटुंबातील युवकांचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचले आहे. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी समयसूचकता आणि योग्य तपास केल्यामुळे मोठ्या संख्येने युवकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे निर्माण होणारे विविध सामाजिक प्रश्न अधिकच […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ मानवधर्म जपण्यासाठी सातत्याने निरपेक्ष सेवाकार्याचा दरवळ पसरवण्यासाठी अनेकजण प्रवाहात उतरत असतात. अशाव्यक्तिमत्वांकडून कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता निव्वळ सामाजिक सेवेचे महत्वपूर्ण कार्य अखंड सुरु असते. इगतपुरी तालुक्यातील विविध सेवा क्षेत्रात अग्रगण्य असणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांचेही कार्य जनतेच्या हृदयात महत्वाचे स्थान राखून आहे. असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गोरख […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा पृथ्वी या घटकावर केलेल्या सर्वोच्च कामगिरीसाठी राजस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात सरपंच गोकुळ सदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० गावकऱ्यांनी एकदा ठामपणे ठरवले तर आपलं गाव विकासाच्या उंचीवर नेण्यापासून त्या गावाला कोणीही रोखू शकत नाही. याचप्रकारे विकासाचा ध्यास घेऊन अत्यंत कमी काळात मोडाळे गावाने केलेला विकास देशाच्या प्रत्येक गावांनी पाहायला हवा. गोरख बोडके यांची विकासाची आत्मीयता अनेक गावांना खऱ्या अर्थाने ग्रामविकास साधायला निश्चितच मदत करील. मोडाळे गावापासून प्रेरणा घेऊन अन्य […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ अल्पकाळात देशाच्या नकाशावर झळकलेल्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल विविध क्षेत्रांमध्ये घेतली जाते. विकासाची घोडदौड वेगवान पद्धतीने करणाऱ्या ह्या गावाला “गोदा सन्मान” पुरस्कार घोषित झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील अतिशय सन्मानाचा असणारा हा पुरस्कार असून आतापर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. विकासाचा ध्यास घेऊन मोडाळे गावाची आगेकूच करणारे […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ घाटनदेवी मंदिराचे पवित्र प्रांगण… सनई, चौघडी, वाजंत्री आणि मंगल वाद्यांचा निनाद… सदाबहार गीतांची रंगत..आली लग्नघटिका समीप नवरा…. सावधान …वाजंत्री सावधचित्त अशा अनेक मंगलाष्टकांची लयदार ललकारी… प्रतिष्ठित मान्यवरांचा आशीर्वाद आणि आयोजकांसह कार्यकर्त्यांची धावपळ… जेवणाची लज्जतदार मेजवानी… असा सगळा शाही सामुदायिक लग्नसोहळा पाहून वधुवरांच्या आईवडील, नातेवाईकांसह वऱ्हाडी मंडळींचे डोळे दिपले. […]