संजीवनी आश्रमशाळेचा दहावीचा निकाल 85 टक्के

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल 85 टक्के लागला आहे.


राजेंद्र गोविंद दासरी याने 74.80 टक्के गुण मिळवून आश्रम शाळेत प्रथम क्रमांक, सावन सुरेश माळी याने 71.80 गुण मिळवून द्वितीय तर लीना दिनेश गोसावी हिने 69.80 टक्के गुण मिळवून आश्रम शाळेमधून तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती प्रमिला गोस्वामी यांच्यासह संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.

विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही आश्रमशाळा चालवली जाते. फारशी अनुकूल शैक्षणिक परिस्थिती नसतांना आणि काहीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना केवळ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांच्या या पाल्यांनी कोणत्याही खाजगी शिकवणीचा आधार न घेता केवळ आश्रमशाळेतील वर्गात मनापासून मेहनत करून हे उत्तम गुण मिळवले आहेत, हे विशेष!

मुख्याध्यापक मनोज गोसावी, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बी. आर. वाले यांच्यासह सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!