प्रहार सैनिक कल्याण संघाचे इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार जाहीर : शिदवाडी येथे रविवारी १ जानेवारीला होणार पुरस्कार वितरण सोहळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – प्रहार सैनिक कल्याण संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रात बहुमोल कामगिरी करून मोठे योगदान देणाऱ्या गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी १ जानेवारीला इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथे शहीद राजेंद्र भले स्मारक प्रांगणात इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कारात सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पत्रकार, राजकीय, दिव्यांग, पोलीस, वन खाते, महावितरण, आरोग्य, सफाई कर्मचारी आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी लष्करामध्ये जवान देणाऱ्या आईवडीलांचा सुद्धा सन्मान होणार आहे. सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कातोरे यांनी केले आहे.

सामाजिक कार्यक्रम व कोरोना काळात मदत करून बहुमोल कामगिरी करणारे छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष गोकुळ धोंगडे, सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत तुकाराम वारघडे, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे नारायण जाधव, दि नाशिक हेराल्डचे पत्रकार लक्ष्मण सोनवणे, पुढारीचे पत्रकार निलेश काळे, सांजेगावच्या सरपंच नीता गोवर्धने, निनावीच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे, रेशीम उत्पादक शेतकरी नाना जाधव, गुलाबाचे शेतकरी विजय बोराडे, अपंगत्वावर मात करून अनेकांना वारकरी शिक्षण देणारे पंढरी महाराज सहाणे, प्रहार दिव्यांग संघटनेचे नितीन गव्हाणे आदींच्या कामाची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कातोरे, उपाध्यक्ष तानाजी चौधरी, कार्याध्यक्ष किसन हंबीर, सचिन शिंदे, नितीन चव्हाण, हरीश चौबे, महिलाध्यक्षा रेखा खैरनार, शैला पाचरणे, आसाराम राठोड, नारायण उपाध्याय, रवींद्र शार्दूल, गुणाजी गांगड, खैरगावचे सरपंच मारुती आघाण यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!