
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा गटसचिव व कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र देवीदास नाठे यांची बिनविरोध निवड झाली आहेत. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत ही निवड घोषित करण्यात आली.देविदास नाठे यांचे जिल्ह्यातील सर्व सचिवांकडुन अभिनंदन करण्यात आले. निवड झाल्यानंतर सचिव संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, मालेगावचे भिला निकम, सिन्नरचे किरण गोसावी, येवलाचे नारायण गोरे, बाळासाहेब खोकले, नाशिकचे चंद्रकांत आवटे व सुनील माळी, केदार, विलास पेखळे, देवळाचे दीपक पवार, दिंडोरीचे नंदू पवार व गवळी, नांदगावचे बाळासाहेब पवार व घुगे आदींसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे, बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर लहाने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व सचिवांनी विश्वासाने सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. विविध कामांच्या माध्यमातून ती सार्थ ठरवुन सचिवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष देविदास नाठे यांनी दिली.