भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीपूर्वी इगतपुरी तालुक्यातील अनेक महत्वाच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम पार पडणार होता. मात्र लोकसभेच्या धुरळ्यामुळे ह्या निवडणुका रखडल्या गेल्या. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर तरी ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त करण्यात येत होती. तथापि तालुक्यातील निवडणूक यंत्रणेकडून अद्याप याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुका […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – अपेक्षेप्रमाणे नाशिक लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेला कौल महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने झुकणारा आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात अधिकाधिक मतांचे दान टाकल्याचे दिसते. इंदिरा काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार तथा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित यांचे मतदारसंघात सत्तास्थान भक्कम करणारा […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात नेहमीच इंदिरा काँग्रेसचे प्राबल्य सिद्ध झालेले आहे. सलग ३ पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत विरोधक एकत्र येऊनही इंदिरा काँग्रेसला विजयापासून रोखू शकलेले नाही. भौगोलिक रचनेत त्र्यंबकेश्वर हा संपूर्ण तालुकाही ह्या मतदार संघात निर्णायक मतांची आघाडी देत असतो. जातीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर असल्याने मतांचे होणारे विभाजन विजयी उमेदवाराच्या […]
भास्कर सोनवणे : संपादक इगतपुरीनामा – निसर्गसंपन्नता भरभरून लाभलेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका आदिवासीबहुल आहे. राजधानी मुंबईचे प्रवेशद्वार असणारा हा तालुका येणाऱ्या दशकभरात राज्याच्या नकाशावरून संपुष्टात येतो की अशी भीती आता वाटायला लागली आहे. शासनकर्त्यांकडून नवनवे प्रकल्प, योजना राबवायच्या झाल्यास त्याची सुरुवात इगतपुरी तालुक्याच्या बलिदानाने होत असते. इगतपुरी तालुका अस्तित्वात आला तेव्हा तालुक्याचे एकूण भौगोलिक […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाट चढून आल्यावर उजव्या बाजूला पुरातन दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. या मंदिरात रामायण कालीन रामसेतुचा दगड पहावयास मिळतो. अनेक वर्षापूर्वी रामेश्वर वरून आलेल्या एका साधूने येथे एका दिवसासाठी येथे मुक्काम केला होता. येथील मंदिराचे पारंपरिक पुजारी असलेले बैरागी यांचे आजोबा शांताराम चौधरी यांनी त्यांची मनोभावे सेवा केली […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या एका २२ वर्षीय आदिवासी युवतीला मृत्यूच्या जबड्यातून घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलने परत आणले आहे. मुंबई, नाशिकच्या नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या प्रकरणात हतबलता व्यक्त करून मोठ्या धोक्याची सूचना दिली होती. मात्र युवतीच्या नातेवाईकांचा मातोश्री हॉस्पिटलवरील पक्का विश्वास आणि […]
इगतपुरीनामा न्यूज – गोरगरिबांच्या घरात आपल्या दैदीप्यमान सामाजिक कार्यामुळे आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे देवदूत म्हणून गोरख बोडके सर्वत्र ओळखले जातात. दिवाळी काळातील आपल्या अभिनव कार्याचा वारसा त्यांनी ह्या वर्षीही जपला आहे. अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे वीज मंडळाचे तत्कालीन जागरूक कर्मचारी अमोल जागले सध्याच्या स्थितीत पाय एक नसल्यामुळे संकटग्रस्त अवस्थेत आहेत. त्यांना एका महिन्यात […]
इगतपुरीनामा न्यूज : श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे यंत्रसामग्री १ ऑक्टोंबरपासून येण्यास सुरवात होणार आहे. उर्वरित लागणाऱ्या लिंक कोनर मशीन वस्त्रोद्योग विभागाच्या उर्वरित भागभांडवलामधून व सामाजिक न्याय विभागाच्या उर्वरित कर्जामधून यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ही सूतगिरणी उत्पादनाखाली […]
इगतपुरीनामा न्यूज : आधार कार्ड धोरणांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलांमुळे आता नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी जन्म दाखला पुरावा जोडणे बंधनकारक आहे. जन्म दाखल्याशिवाय अन्य कुठलाही पुरावा यासाठी ग्राह्य मानला जात नाही. यापूर्वी जन्म दाखला नसला तरी केवळ रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सुध्दा नवीन आधार कार्ड नोंदणी करणे शक्य होते, मात्र या वर्षी […]
इगतपुरीनामा न्यूज : राज्यात दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात जवळपास तीस हजार जागा भरण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्पष्ट केले होते. त्यासाठीचे वेळापत्रकही त्यांनी जाहीर करून 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र 15 ऑगस्ट नंतर आज सहा […]