घोटी टोल नाक्यावर मनसेचे जोरदार आंदोलन ; शेकडो वाहने टोल न भरताच रवाना

इगतपुरीनामा न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यावरुन तीन चाकी, चार चाकी वाहनांकडुन कोणताही टोल आकारला जात नसुन केवळ कमर्शियल वाहन धारकांकडुन टोल आकारला जात आहे. हाच धागा पकडुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देत असुन कोणत्याही […]

बारा दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नसल्याने इगतपुरीकरांचे नगर पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – पावसाच्या माहेरघरीच पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे. इगतपुरी शहरातील शिवाजी नगर, पंढरपूर वाडी, सह्याद्रीनगर येथील रहिवाशांना गेल्या दहा ते बारा दिवसांपासून भावली धरणातुन येणारी पाणीपुरवठा योजनेची नवीन पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा होत नाही. नगरपरिषद प्रशासनाला वारंवार सांगूनही पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी चक्क टँकर मागविण्याची वेळ […]

इगतपुरी तालुक्यात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद : सरकारविरोधात नागरिकांशी साधला संवाद ; घोटी येथे झाला समारोप

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण होत असल्याने जनसंवाद यात्रेची राज्यात सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने सोमवारपासून यात्रा सुरु आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची जनसंवाद यात्रा पार पडली. यावेळी गेल्या […]

एकलव्य निवासी शाळेत कायम सामावून घेण्यासाठी शिक्षकांचे आमरण उपोषण सुरु

इगतपुरीनामा न्यूज – राज्यातील ३७ एकलव्य निवासी शाळेतील शिक्षकांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी या शाळेतील शिक्षक आज शिक्षक दिनापासून आपापल्या शाळेत आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावित यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि प्रकल्पाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. राज्यात ३९ एकलव्य निवासी शाळा सुरु असून सरळ सेवा भरतीद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र […]

अशैक्षणिक कामे बंद करून शिकवण्याचे काम करू द्या ; विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या हातून घडूद्या : शिक्षकांकडून शिक्षक दिनी नाशिक जिल्हाभरात शासनाचा निषेध

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षकांना ज्ञानदानाच्या पवित्र कामापासून वंचित ठेवून प्रचंड शैक्षणिक कामांचा बोजा लादला जातो. शिकवण्याच्या कामापासून दूर ठेवण्याचे शासनाचे धोरण आणि काही लोकप्रतिनिधी शिक्षकांबद्दल सोशल मीडियातून अवमानकारक वक्तव्य करतात याच्या निषेधार्थ आज आंदोलन झाले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात सर्व शिक्षकांनी शिक्षक […]

लाठीचार्ज घटनेतील जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करा : मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण तातडीने द्या : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – जालना जिल्हातील अंतरवाली सराटी ता. अंबड येथील मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अशांत झाला आहे. या गंभीर घटनेची युद्धपातळीवर चौकशी करून संबंधित जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर  कठोर कारवाई करावी, मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण लवकर मिळण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस […]

इगतपुरी तालुका सकल मराठा समाजातर्फे लाठीचार्ज घटनेबद्धल शासनाचा निषेध : इगतपुरीच्या तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली ता. अंबड येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचा इगतपुरी तालुका मराठा समाजाने तीव्र निषेध केला आहे. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना आज इगतपुरी तालुका सकल मराठा समाजातर्फे निषेधाचे निवेदन देण्यात आले. यापुढेही रस्त्यावर उतरून निषेध करून […]

जालना येथील निषेधार्ह घटनेला जबाबदार राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचा निषेध : नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीने संताप व्यक्त : उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये होणार सहभागी

इगतपुरीनामा न्यूज – जालना येथील मराठा समाजाचे शांततेच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन जाणून बुजून भडकवण्यासाठी आणि चिरडून टाकण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून तीव्र लाठीचार्ज करण्यांत आला. महिला, वृद्ध ,लहान मुले, युवक आदींवर कुठलीही शहानिशा न करता लाठीचार्ज करण्यात आला. ह्या घटनेचा नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने आज जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक येथे आज समाजातील […]

समृद्धीच्या ब्लास्टींगमुळे धामणीतील घरांना तडे : लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आमरण उपोषण स्थगित

इगतपुरीनामा न्यूज – धामणी येथे समृद्धी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात सुरुंग लावून ब्लास्टींग केले जात आहे. यामुळे येथील अनेक घरांना मोठे तडे गेले असुन अनेक घरांची पडझड झाली आहे. समृद्धीचे काम करणाऱ्या कंपनीकडुन भरपाई मिळण्यासाठी काँग्रेसचे उत्तमराव भोसले व धनंजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून धामणी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले होते. आज तिसऱ्या दिवशी एमएसआरडीसीचे […]

युरिया खतांबाबत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवा : वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कृषी साहित्याचे विक्रेते युरिया खत नसल्याचे भासवून चढ्या भावाने शेतकऱ्यांची लूटमार करीत आहेत. त्यांना सरकारी दराने युरिया खताची विक्री करण्याचे आदेश देण्यात यावे, दुकानांची अचानक तपासणी करावी. दुकानाच्या बाहेर खते बी बियाणे, औषधे यांचे दरपत्रक, शिल्लकसाठा यांचा फलक लावावा आदी मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, तालुका निरीक्षक […]

error: Content is protected !!