इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा नगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार कामकाजाबाबत इगतपुरीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी, तोंडी, फोन द्वारे तक्रारी केल्या. मात्र अद्याप पर्यंत ह्या आरोग्य केंद्रातील कामकाजात काहीही सुधारणा झालेली नाही. एकही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात रहात नाही. रुग्णांवर सफाई कर्मचारी व नर्स उपचार करत असतात. दोन दिवसापूर्वी सातूर्ली फाट्यावरील अपघातात दहा प्रवासी जखमी झाले होते. त्या सर्व जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना उपचारासाठी घोटीला पाठवण्यात आले. अशा घटना अनेक वेळा या ठिकाणी घडतात. रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळत नसल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. यामुळे गरीब कष्टकरी शेतमजूर आदिवासी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याला जबाबदार असणारे वैद्यकीय अधिकारी यांची तात्काळ बदली करून नवीन वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटना मृत आरोग्य व्यवस्थेची प्रेतयात्रा काढणार आहे. उद्या शनिवारी ३१ ऑगस्टला ह्या आंदोलनातून निषेध व्यक्त करणार आहोत अशी माहिती संस्थापक अध्यक्ष भगवान मधे, तालुकाध्यक्ष काळू निरगुडे, तालुका सचिव राजू भगत यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस ठाणे घोटी यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group