स्वातंत्र्यदिनी बलायदुरी येथे रस्त्यात भात लागवड करून संतप्त ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – बलायदुरी गावात पारदेवीकडे जाणाऱ्या रस्त्याची  चिखलमय अवस्था आहे. येथून हॉटेलकडे जाणाऱ्या वाहनांमुळे अधिकच रस्ते खराब झाले. रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम खाते दाद देत नसल्याने माजी सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज स्वातंत्र्यदिनी रस्त्यात भात लागवड केली. बलायदुरी ता. इगतपुरी  येथील गुडघाभर चिखल असणाऱ्या गावातील रस्त्यात चक्क भाताची लागवड करून अनोख्या मार्गाने […]

पोषण आहार योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत धरणे आंदोलन : निता वारघडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांकडे दिले मागण्यांचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज : राज्यातील जिल्हा परिषद शाळा तथा खाजगी शाळेतील १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तथा शालेय पोषण आहार योजना सुरु आहे. ह्यामध्ये कंत्राटी तत्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र […]

संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटातर्फे इगतपुरीत धरणे आंदोलन करून पोलिसांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शिवराम झोले व कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आले. विकृत भाष्य करणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे या विकृत प्रवृतीच्या व्यक्तीने देशाचे थोर महान व्यक्तीमत्त्व महात्मा गांधी, महात्मा जोतिबा […]

स्वराज्य पक्षाकडून महामार्ग, जुनवणेवाडी आणि विविध भागात रस्त्यासाठी आंदोलन : जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य प्रमुख संभाजी राजे छत्रपती, संपर्कप्रमुख करण गायकर, सरचिटणीस धनंजय जाधव आणि नाशिक जिल्ह्यात जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांचा मार्गदर्शनाखाली विविध भागात रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले. जुनवणेवाडी येथे रस्ता नसल्याने मयत झालेल्या दुर्दैवी भगिनीला स्वराज्य पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी पदाधिकाऱ्यांनी पिडीत कुटुंबाची विचारपूस आणि चौकशी केली. महिलेवर वैदूकडून […]

दयनीय रस्त्याबाबत स्वराज्य संघटना आक्रमक ; घोटी सिन्नर महामार्गावर रस्त्याचे घातले श्राद्ध

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची दशा खूपच केविलवाणी झाली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. स्वराज्यचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. घोटी सिन्नर महामार्गावर खराब रस्त्याचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त करण्यात आला. समृद्धी महामार्गामुळे रस्त्याची वाट लागली आहे. वाहनधारक मेटाकुटीस आले […]

गरोदर महिलेसह बाळाच्या मृत्युला जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : मनसेचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथील गरोदर महिला वनिता भाऊ भगत हिचा पायपीट केल्यामुळे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन मृत्युला जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारावकर यांना देण्यात आले. जुनवणेवाडी, तळोघ, ता. इगतपुरी […]

किरीट सोमय्या यांच्या गलिच्छ व्हिडिओ प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करा : महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रपती, राज्यपाल आणि गृहमंत्र्यांना पत्र

इगतपुरीनामा न्यूज – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सोशल मिडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. यात किरीट सोमय्या हे अतिशय गलिच्छ पद्धतीने मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करतांना दिसत आहेत. या व्हिडिओची सत्यता तपासणी करून नक्की यात दोषी जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज  राष्ट्रपती, राज्यपाल, गृहमंत्री यांच्याकडे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष […]

अधिस्वीकृती समितीवर चुकीच्या पद्धतीने सदस्यांच्या नियुक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट ॲक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांनाच पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती देण्यात आली आहे. न्यास नोंदणी व संघटना नोंदणीचे स्वतंत्र कायदे आणि विभाग आहेत. असे असताना माहिती आणि जनसंपर्क विभागाने थेट पत्रकारांच्या सेवाभावी संस्थांनाच संघटना गृहित धरले आहे. याबाबत चौकशी करुन चुकीचे प्रस्ताव मंजुर […]

घोटीत संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक सही संतापाची उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही सतापाची हा उपक्रम राबवण्यात आला. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात झालेला चिखल व अभद्र झालेल्या युत्या या विरोधात घोटी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे मनसेचे उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी एक सही संतापाची सही करण्यासाठी मनसे पदाधिकारी […]

देवळे खैरगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन : स्वराज्यचे तालुका संघटक कृष्णा गभाले यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील देवळे खैरगाव रस्त्याची वाट लागली असून ह्या रस्त्यावर छोट्या मोठया अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. वाहनधारक मेटाकुटीस आले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. म्हणून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वराज्य संघटनेचे तालुका संघटक कृष्णा गभाले यांनी दिला आहे. […]

error: Content is protected !!