युवकाला चिरडल्याने महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर ग्रामस्थांचा संताप अनावर ; दोन दोन किमीवर लागल्या वाहनांच्या रांगा : वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे नाही, मृतदेहाला हात लावू देणार नाही : अनेक अपघातामुळे ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव फाट्यावर मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रकने पायी चालणाऱ्या युवकाला धडक देऊन झालेल्या अपघातात हा युवक जागीच ठार झाला. अविनाश कैलास गतीर असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. आज सायंकाळी झालेल्या या घटनेमुळे मुंढेगाव परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचा अतिरेक झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूला रास्ता रोको आंदोलन सुरु झाले आहे. मुंढेगाव फाट्यापासून दोन्ही […]

सलगच्या अवकाळीने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : सरसकट विमा मंजूर करून नुकसान भरपाई द्या – इंदिरा काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतात कापणी केलेल्या भाताचे व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भिजलेल्या भाताला मोड फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनस्तरावर याची दखल घेऊन शेतकऱ्यांचा सरसकट पीकविमा मंजुर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. आमदार हिरामण […]

मुकणेच्या आवर्तनामुळे कुऱ्हेगावला भातपिकांचे नुकसान : शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा धरणावर झोपा काढो आंदोलनाचा छावा क्रांतिवीर सेनेचे गोकुळ धोंगडे यांचा इशारा

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील शेतकऱ्यांना पूर्व कल्पना न देताच मुकणे धरणाचे आवर्तन सोडले. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून ठेवलेल्या भाताची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. मुकणे धरणाचे शाखाधिकारी विजय ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांविषयी […]

सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ ; मराठा आरक्षणाचा ७० टक्के लढा आपण जिंकलोय – मनोज जरांगे पाटील : इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील सभेत मराठा समाजबांधवांचा एल्गार

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – मराठा समाजाला आरक्षणासाठी गेली ७० वर्ष पुरावे सापडत नव्हते. आता राज्यातील सगळ्या जिल्ह्यात १८०५ ते १९६७ पर्यंतचे जुने पुरावे सापडत आहेत. ज्यात आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शासनाची सुट्टी नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्वास मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी इगतपुरी तालुक्यातील शेणित […]

सकल मराठा समाजाच्या वतीने गोंदे दुमाला येथे अन्नत्याग करीत उपोषण सुरु

इगतपुरीनामा न्यूज – मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्रामधे जोर घेत असून याला इगतपुरी तालुक्यात विविध गावांनी समर्थन दिले आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा समर्थनार्थ गोंदे दुमाला येथे सामाजिक कार्यकर्ते रतन नाठे आणि ग्रामस्थांनी अन्नत्याग करीत उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी कडक […]

मराठा आरक्षण आंदोलन – वाडीवऱ्हे सोसायटीचे संचालक समाधान गवते यांचा राजीनामा

शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक समाधान गवते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गोंदे दुमाला येथील दीपिका नाठे, धामणी येथील रंजना लाड यांनी कालच राजीनामा दिला आहे. आरक्षण आंदोलनाचे लोन तालुक्यात पसरत असून अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मूक […]

नाथपंथी समाजाच्या ग्रामपंचायत सदस्या रंजना लाड यांचा मराठा आरक्षण समर्थनार्थ पदाचा राजीनामा : धामणी येथील मराठा समाजाच्या ऋणानुबंधातून घेतला निर्णय

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रंजना विनायक लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला समर्थन म्हणून राजीनामा दिला आहे. धामणी ह्या गावात मराठा समाजाचे प्राबल्य असून गावात नाथपंथी गोसावी समाजाचे एकच घर आहे. असे असतांना सर्व मराठा समाजाने ग्रामपंचायतीत संधी देऊन पद सुद्धा […]

मराठा आरक्षण आंदोलनासाठी गोंदे दुमाला येथील महिला ग्रामपंचायत सदस्या दीपिका नाठे यांचा राजीनामा : मराठा बांधवांवरील अन्यायाविरोधात लढण्यासाठी तालुक्यातील पहिलाच राजीनामा

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या दीपिका शरद नाठे यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इगतपुरी तालुक्यात त्यांचा पहिलाच राजीनामा असून अन्य गावांत राजीनाम्याचे सत्र सुरु होणार आहे. सकल मराठा बांधव गेली अनेक वर्षे आरक्षणासाठी लढा देत आहेत. समाज बांधवांवर होणारा […]

जरांगे पाटलांची काळजी न घेतल्यास महाराष्ट्राची शांतता धोक्यात येईल : स्वराज्य पक्ष पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – मराठा समाज आरक्षणाचे केंद्रबिंदू मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती झपाट्याने खालावत आहे. मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी ते उपोषणाला बसले असून त्यांच्या आरोग्याबद्दल खरी चिंता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अन्यथा शांततेत सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे राज्याची शांतता धोक्यात येऊ शकते असा इशारा स्वराज्य पक्षाने दिला […]

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मुकणेकरांची पुढाऱ्यांना गावबंदी : एक मराठा, लाख मराठा घोषणा देत नोंदवला निषेध

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ इगतपुरी तालुक्यात अनेक गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. आज पाडळी फाटा येथे मुकणे ग्रामस्थांनी घोषणाबाजी करून आमदार, खासदार व पुढारी यांना गावबंदी केल्याचे बॅनर लावून करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मुदत देऊनही […]

error: Content is protected !!