इगतपुरीनामा न्यूज – मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शिवराम झोले व कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आले. विकृत भाष्य करणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे या विकृत प्रवृतीच्या व्यक्तीने देशाचे थोर महान व्यक्तीमत्त्व महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले व आपल्या सर्वाचे दैवत साईबाबा या सर्वांवर खालच्या पातळीवर टीका केली. अशा व्यक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट इगतपुरी तालुक्याच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील वाजे, इगतपुरी शहराध्यक्ष वसीम सय्यद, माजी सभापती पांडुरंग वारुंगसे, नारायण वळकंदे, समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, उपाध्यक्ष सिध्दार्थ भामरे, हरिष चव्हाण, मदन कडू, माजी नगरसेवक यशवंत दळवी, मिलिंद हिरे, पोपट भागडे, डॉ. सुधाकर जगताप, वसंत भोसले, माजी सभापती विष्णू चव्हाण, अनिल पढेर, त्रिंगलवाडीचे सरपंच अशोक पिंगळे, पिंपळगाव भटाटाचे सरपंच बळवंत हिंदोळे, ज्ञानेश्वर पासलकर, दिपक मावरीया, शरद वायदंडे, आकाश खारके, शाम जगताप, जुबेर पठाण, संतोष वारुंगसे, बाळु जोशी, काशिनाथ कोरडे, आनंदा डाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.