इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
इगतपुरी शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी हळूहळू स्थिरावत असून दिलासादायक वातावरण निर्माण होतांना दिसत आहे. असे असले तरी स्थिर रुग्णसंख्येमुळे कोरोनामुक्तीकडे सुरू असलेल्या वाटचालीला ब्रेक लागला आहे. अजून काही दिवस तरी कोरोनामुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल करता येणार नसल्याचे चित्र समोर येत आहे.
सद्यस्थितीत आज हाती आलेल्या आकडेवारी नुसार तालुक्यात एकूण ८८ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी १० नवीन रुग्ण आज नव्याने दाखल झालेले आहेत. आज फक्त ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आकडे लहान वाटत असले तरी त्याकडे गंभीरतेने बघायची गरज आहे. कारण मध्यंतरी कमी होत असलेली नवीन रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागली असून तुलनेने कोरोना मुक्त रुग्णांची आकडेवारी कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी कोरोनामुक्तीकडे होत असलेली वाटचाल खडतर आहे असेच म्हणावे लागेल. दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा, लक्षणे आढळून आल्यास लपवाछपवी न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008