
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर हेच विकासपुरुष आहेत. त्यांना अधिकाधिल मताधिक्य देऊन दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी मी माझी अपक्ष उमेदवारी माघारी घेत आहे. त्यांच्या घड्याळ निशाणीसमोरचे बटन दाबून जास्तीतजास्त मतांनी विजयी करावे असे आवाहन अपक्ष उमेदवार विकास शेंगाळ यांनी केले आहे. मतदारसंघाचा विकास हे माझे ध्येय असून हे ध्येय पूर्णत्वाकडे जाण्यासाठी महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर हे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी माझा जाहीर पाठींबा घोषित करीत अपक्ष उमेदवार विकास शेंगाळ यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हिरामण खोसकर यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांचा पाठिंबाही वाढत आहे.