निराधार बालकांसाठी डॉ. दिघावकर यांच्याकडून ट्रस्टची स्थापना

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

कोरोनाच्या काळात अनेक पालकांचे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे बालके अनाथ झाली आहेत. अशा निराधार बालकांना शिक्षणाला हातभार लावण्यासाठी COVID-19 ORPHANS WELFARE TRUST NASHIK ही ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. आज नाशिकच्या आयमा हॉल येथे अध्यक्ष डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत ट्रस्टच्या नियोजित कार्याबाबत पत्रकारांना माहिती दिली.

ह्या ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षपदी नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, उपाध्यक्षपदी आयमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिवपदी अभिषेक गोरख बोडके यांची निवड केल्याचे घोषित करण्यात आले. विश्वस्त म्हणून डॉ. अतुल वडगावकर, डांगसेवा शिक्षण मंडळाच्या सचिव मृणाल जोशी, प्रज्ञा पाटील, स्वप्ना राणे, गोरख बोडके आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शासकीय योजनेचे सहाय्य न घेता या ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनाथ बालकांना सहकार्य केले जाणार आहे. गोरख बोडके, डॉ. अतुल वडगावकर यांनी या ट्रस्टसाठी प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले. जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना मदत लागल्यास खालील पत्यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑफिस पत्ता – डांगसेवा मंडळ 217, स्वामी समर्थ अपार्टमेंट, महात्मा नगर, नाशिक 422007 संपर्क – 02532351057