ट्रेलरची सात आठ वाहनांना धडक ; १३ जण जखमी : कसारा घाटातील घटना

इगतपुरीनामा न्यूज – नवीन कसारा घाटामध्ये धबधबा पॉईंटच्या ठिकाणी हायवे लगत सहा सात वाहने थांबलेली असताना मुंबईच्या दिशेने मोठ्या लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाला. त्यातच घाटात धुके असल्याने वाहनाचा अंदाज न आल्याने थांबलेल्या सहा ते सात वाहनांना धडक दिली आहे. यात जवळपास तीन ते चार जण गंभीर  जखमी झाले आहेत तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील काही प्रवासी हे त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने बचावले आहेत. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवितहानीची नोंद नाही. परंतु कसारा घाट परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात वाहने उभी केलेली होती. या ठिकाणी कोणतेही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!