
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे समाजातील अनेक घटकांचा रोजगार बुडाला आहे. अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच लॉकडाऊन मुळे ऑर्केस्ट्रा कलावंतांचे काम बंद आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबांचे नियोजन कोलमडल्याने उपासमार सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आज नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनतर्फे २५० किलो धान्य, चहा, साखर व खाद्यतेल जमा करण्यात आले. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या सर्व खाद्यवस्तूंचे वाटप पात्र गरजू ऑर्केस्ट्रा कलावंतांना केले.
वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, सचिव डॉ. मनिषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, पदाधिकारी किशोर शिरसाठ यांच्यासह नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे संस्थापक उमेश गायकवाड, अध्यक्ष फारुख पिरजादे, कार्याध्यक्ष कमलेश शिंदे हे उपस्थित होते. स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन नाशिक सायकलिस्टस पदाधिकारी पुढे येऊन सर्वांनी आम्हाला मोठे साहाय्य केले. आमची गरज ओळखून मदत केली त्याबद्दल कलावंतांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.