खंबाळे येथे भरदिवसा घरफोडी ; १ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे भरदिवसा दुपारी ३ ते ६ वाजच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने १ लाख ५४ हजाराची घरफोडी केली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. रामनाथ केरू शिंगोटे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडुन ही घरफोडी करण्यात आली आहे. शोकेस, कपाटाचे ड्रॉवर उघडुन साक्षीदार गणेश पढेर, भगवान पढेर यांचे घरातील रोख रुपये आणि सोन्याचे दागिने लांबवण्यात आले आहेत. रोख रक्कम ४३ हजार, ७५ हजाराचे सोन्याचे नेकलेस, ३० हजाराची सोन्याची पोत, ६ हजाराचे कानातले सोन्याचे टॉप्स असा एकूण १ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने घरफोडी करुन चोरुन नेला म्हणुन रामनाथ केरू शिंगोटे, वय ४६ वर्ष, रा. खंबाळे ता. इगतपुरी यांनी फिर्याद दिली आहे. घोटी पोलिसांनी भादंवि कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे अधिक तपास करीत आहेत. संशयित चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून लवकरच संबंधित संशयितांना गजाआड करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!