विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बळकटीमुळे नवचैतन्य – विधानसभाध्यक्ष पांडुरंग खातळे : उमेदवार निवडून आणून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना देऊ दिवाळी गिफ्ट

  इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील दोन्हीही तालुक्यात विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांमुळे पक्षाचा दबदबा वाढला आहे. येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने पक्षाने सांगितलेला उमेदवार निवडून आणून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना दिवाळी गिफ्ट देऊ अशी आनंदी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इगतपुरी विधानसभा […]

आमदार खोसकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्याकडून स्वागत

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हा पक्ष नसून विकासाभिमुख विचारधारा आहे. ह्या विचारधारेतून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात हा पक्ष बळकट झाला आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि त्यांच्या सोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. ही घटना इगतपुरी मतदारसंघाच्या चांगल्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी […]

पक्षांतरामुळे बदलले विधानसभा निवडणुकीतील डावपेच ; ‘अशी’ असेल इगतपुरीतील राजकीय उलथापालथ : आज घोषित होणार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरीत एका पक्षाने मोठे केल्यानंतर त्या पक्षाला झुगारून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली जाण्याचा इतिहास आहे. आमदारकीसाठी असा आटापिटा ह्या मतदारसंघात बऱ्याचदा दिसतो. ह्या निवडणुकीसाठी पक्षांतराची स्थित्यंतरे घडायला सुरुवात झालेली आहे. आज दुपारी निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल. यानंतर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीला वेग येणार आहे. […]

आमदार हिरामण खोसकर यांचा दिग्गज पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश : इगतपुरी विधानसभेची राजकीय समीकरणे पक्षांतरामुळे बदलली

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दिग्गज पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मूळचे काँग्रेसचे पण शिक्षक मतदारसंघात शिवसेना उबाठाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे, त्र्यंबकेश्वरचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी जिल्हा परिषद […]

इगतपुरीसाठी युवानेते बाळासाहेब झोले यांना उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडून कामाला लागण्याचे संकेत 

इगतपुरीनामा न्यूज – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची सिन्नर दौऱ्यात माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष  डाॅ.श्रीराम लहामटे यांनी अजित दादांना बाळासाहेब झोले यांना उमेदवारी देण्यात यावी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सदर जागा सोडण्यात यावी अशी मागणी केली. […]

जनसेवेसाठी २४ तास सक्रिय असणारे सर्वसमावेशक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ : सर्वात तरुण आमदार म्हणून गिनीज बुकात नोंद : शिवसेना शिंदे गट तथा महायुतीतर्फे २०२४ ला होणार आमदार

भास्कर सोनवणे – इगतपुरीनामा न्यूज – २००४ पूर्वीच्या काळात इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाचे भयाण वास्तव, पाण्यासाठी गावोगावी होणारा मायबहिणींचा आटापिटा, शिक्षणाच्या सोयीसुविधांचा अभाव, रस्ते आणि दळणवळणाच्या दरिद्री व्यवस्था, युवकांना स्वयंरोजगार आणि हक्काच्या रोजगारासाठी करावी लागणारी कसरत आणि भूमिपुत्र शेतकऱ्यांचा पिकांना पाणी द्या म्हणणारा आर्त टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. हे जळजळीत भयानक वास्तव […]

शिवसेनेचे प्रबळ इच्छुक उमेदवार रवींद्र भोये यांना इगतपुरी परिसरात अभूतपूर्व प्रतिसाद : इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा दिला शब्द

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी कमी व्हावी म्हणून दोन्हीही तालुक्यात अजून औद्योगिक वसाहतीसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे. इगतपुरी त्र्यंबकला मोठ्या कंपन्या आणल्यानंतर येथील स्थानिक बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. मोठ्या प्रमाणात धरणे असून देखील मार्च महिन्यानंतर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यावर […]

कोण म्हणतं इगतपुरी विधानसभा काँग्रेसचा बालेकिल्ला ?? हा तर माजी आमदार निर्मला गावित यांचाच करिष्मा..!!

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – जो तो उठतो सुटतो अन इगतपुरी विधानसभा मतदारसंघ इंदिरा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणतो. काँग्रेसचा हा मतदारसंघ अजिबातच बालेकिल्ला नसून दोन टर्म आमदारकी भूषवलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांचा हा करिष्मा आहे. अर्थातच इगतपुरी तालुक्याचे तारणहार लोकनेते स्व. गोपाळराव तथा दादासाहेब गुळवे यांच्या आशिर्वादाशिवाय हा करिष्मा होणे दुरापास्त आहे. इंदिरा काँग्रेस […]

बाळासाहेब झोले, तुम्ही आमदार नक्कीच व्हाल..! : नवदुर्गा लाडक्या बहिणींकडून शुभेच्छारुपी आशीर्वाद

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले हे अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवार असून तालुक्यात त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू आहे. दोन्ही तालुक्यात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगत आहे. त्यांच्या उमेदवारीचे दिंडोरी, पेठ, देवळाली, मनमाड, नांदगाव मतदार संघाच्या त्यांच्या लाडक्या बहिणींनी […]

मदन कडू यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदगाव सदो गटप्रमुखपदी सार्थ निवड : इगतपुरी तालुक्यातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

इगतपुरीनामा न्यूज – तळोघ, ता. इगतपुरी येथील मदन किसन कडू यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या नांदगाव सदो जिल्हा परिषद गटप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, नाशिक जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, माजी आमदार शिवराम झोले, इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे आदींच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने […]

error: Content is protected !!