
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा इगतपुरी विधानसभा अध्यक्ष पांडुरंग खातळे यांच्या शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली आहे. संपूर्ण १२ जागांपैकी आज ७ जागांची मतमोजणी पार पडली. ह्या ७ जागा आणि यापूर्वीव बिनविरोध झालेल्या ५ जागा अशा १२ जागा जिंकून शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद बहुमत संपादन केले. संपूर्ण तालुक्यात यशस्वी संचालकांचे अभिनंदन सुरु आहे. पांडुरंग खातळे ह्या युवा नेतृत्वाला कायमच कऱ्होळे गावाच्या राजकारणात यशाचा मार्ग सापडतो. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज विविध कार्यकारी सोसायटीवर एकतर्फी सत्ता स्थापन करण्यात आली. तालुक्याच्या राजकारणात पांडुरंग खातळे यांचे नेतृत्व वजनदार झाले असल्याचे नूतन संचालकांनी सांगितले.
भीमाबाई संतू खातळे, सीताबाई रघुनाथ खातळे, तुकाराम कचरू खातळे, रामचंद्र दामू खातळे, दादा भिका भवर हे यापूर्वी संचालकपदावर बिनविरोध निवडून आलेले आहेत. आज झालेल्या मतमोजणीमध्ये ॲड. दिनकर खातळे यांचे बंधू निवृत्ती संतू खातळे, अंकुश आवजी आघाण, अशोक श्रावण आघाण, कृष्णा श्रावण आघाण, पांडुरंग हरी आघाण, पांडुरंग सदू आघाण, हरी भिवा आघाण हे संचालक म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गायकवाड यांनी कामकाज पाहिले. भरत खातळे, रामदास खातळे, भाऊसाहेब खातळे, तुकाराम खातळे, ज्ञानेश्वर निमसे, अर्जुन खकाळे, रतन भवर, गोविंद खातळे, लक्ष्मण खातळे, दत्तू खातळे, राजाराम खातळे, सागर खातळे, विशाल खातळे, बाळू खातळे, दिनकर खातळे, दिनकर बांडे, गंगाराम भगत, तुकाराम भवर आदी ग्रामस्थांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.