इगतपुरी तालुक्यातील “या” ग्रामपंचायतींवर येणार महिलांचे राज्य : कारभारणीला सरपंचपद देण्यासाठी राजकारणाला येणार गती

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज( ही बातमी कोणीही कॉपी करून अन्य प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ) संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष असणाऱ्या ग्रामपंचायत आरक्षणानंतर महिलांसाठी आरक्षित होणाऱ्या ग्रामपंचायती कोणत्या याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यानुसार आज स्वतंत्रपणे महिलांच्या आरक्षणाची निश्चिती करण्यात आली. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी ओमकार पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सोडत कार्यक्रम पार पडला. अनुसूचित जाती स्त्री साठी कुऱ्हेगाव, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी वाडीवऱ्हे, दौंडत, भरवीर बुद्रुक, मुंढेगाव, सांजेगाव, पाडळी देशमुख, मोडाळे, घोटी खुर्द, नांदगाव बुद्रुक, ह्या ग्रामपंचायती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी शिरसाठे, निनावी, पिंपळगाव घाडगा, मालुंजे, साकुर, अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी मुकणे, समनेरे, धामणगांव, टाकेद खुर्द, शेवगेडांग, धार्णोली, उभाडे, खैरगांव, बारशिंगवे, वाकी, पिंपळगांव भटाटा, इंदोरे, धामणी, अधरवड, देवळे, त्रिंगलवाडी, वाळविहीर, घोटी बुद्रुक, तळोशी, चिंचलेखैरे, अडसरे बुद्रुक, बेलगांव तऱ्हाळे, मानवेढे, कुरुंगवाडी, आवळखेड, टाके घोटी, कुशेगांव, मोगरे, नागोसली, उंबरकोन, तळोघ, टिटोली, कऱ्होळे, भावली बुद्रुक ह्या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. आता गाव पातळीवरील राजकारणाला कलाटणी मिळणार असून निवडणुका घोषित होण्याची उत्सुकता वाढली आहे. येत्या काही दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याने पॅनल निर्मिती, कागदपत्रे जमवाजमव सुरु झाली आहे.

error: Content is protected !!