
इगतपुरीनामा न्यूज – भाजपा सहकार आघाडी नाशिक दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच झाली. भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी दक्षिण नाशिक जिल्हाध्यक्षपदी संजय पुंजाजी झनकर (भरविर बुद्रुक ) यांची निवड झाली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी गौरव विसपुते ( देवळाली गाव ), विलास देशमुख ( दिंडोरी ) संजय काळे (नानेगांव ) पांडुरंग बोरसे ( त्र्यंबकेश्वर ) यांची वर्णी लागली. सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाभर अभिनंदन होत आहे. जिल्हा सरचिटणीस पदी हरिश्चंद्र बऱ्हे (अधरवड ), सुनिल केदार ( दिंडोरी ), जिल्हा सरचिटणीस निवृत्ती अरिंगळे (नाशिकरोड ), मनोजकुमार रिके ( घोटी ), कोषाध्यक्ष अनिल चौधरी, शिवानंद संधान, जिल्हा कोषाध्यक्ष विजय पिंगळ ( खंबाळे ), जिल्हा सदस्य काशिनाथ भडांगे ( दिंडोरी ) अंबादास भोये, जिल्हा सदस्य (पेठ ), शशिकांत भुसारे (दाभाडी ), गोरखनाथ भोसले (पेठ ) जिल्हा सदस्यपदी राजु धोंडीराम पेखळे, प्रशांत हगवणे, सुनिल शांताराम केदार, मधुकर कापसे, पांडुरंग निसाळ, देवीदास चौधरी, सागर काकडे, सोपान पडवळ, प्रशांत गवळी, सुरेश जोंधळे सुरेश गुंजाळ, काळु भारस्कर, सुरेश गावंढे, प्रकाश मुथा, हिरामण कवटे यांची निवड करण्यात आली. निवड झाल्याबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. माझ्यावर वरिष्ठांनी जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवून येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा सहकार क्षेत्रात सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सहकार क्षेत्रातील इतर पक्षातील लोकांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करीन. सहकार क्षेत्रात आपली पकड मजबूत करू अशी प्रतिक्रिया भाजपा सहकार आघाडी नूतन दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय झनकर यांनी दिली.