इगतपुरी – ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण घोषित ; २३ ला महिलांचे आरक्षण निघणार : इच्छुक उमेदवारांच्या पूर्वतयारीला येणार गतिमानता

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्युज – इगतपुरी तालुक्यातील ४ मार्च २०३० पर्यंत मुदत मुदत संपणाऱ्या ९६ ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदांचे आरक्षण आज घोषित करण्यात आले. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात आली. बदललेल्या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील राजकारणात उलथापालथ होणार असल्याचे आजच्या सोडतीमुळे दिसून आले. आजच्या सोडतीनंतर बुधवारी २३ एप्रिलला महिलांसाठी काही ग्रामपंचायतींची सरपंच पदे जाहीर करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नंतर लगेचच रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुरळा होईल अशी शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांच्या पूर्वतयारीला आजपासून गतिमानता येणार आहे. 

अनुसूचित क्षेत्रातील टाकेघोटी, फांगुळगव्हाण, पिंपळगांव मोर, आंबेवाडी, आवळखेड, कुशेगांव, कऱ्होळे, वाकी, त्रिंगलवाडी, टाकेद बुद्रुक, मोगरे, अडसरे खुर्द, पिंपळगांव भटाटा, वाळविहीर, धामणगांव, धारगांव, भावली बुद्रुक, मायदरा धानोशी, घोटी बुद्रुक, टाकेद खुर्द, नागोसली, भरवज, इंदोरे, पिंप्री सद्रोद्दीन, ओंडली, आवळी दुमाला, धामणी, भावली खुर्द, आडवण, वासाळी, अधरवड, तळोशी, उंबरकोन, रायांबे, आहुर्ली, चिंचलेखैरे, सोमज, शेवगेडांग, म्हसुर्ली, अडसरे बुद्रुक बोरटेंभे, धार्णोली, कोरपगांव, बेलगांव तऱ्हाळे, नांदगांव सदो, उभाडे, देवळे, काळुस्ते, तळोघ, कांचनगांव, सोनोशी, खेड भैरव, टिटोली, खैरगांव, मांजरगांव, बोर्ली, कुर्णोली, खडकेद, शेनवड बुद्रुक, मानवेढे, बलायदुरी, बारशिंगवे, खंबाळे, कुरुंगवाडी ही गावे अनुसूचित जमातीसाठी कायम राखीव आहेत. यापैकी काही ठिकाणी महिलांना संधी मिळेल. मात्र याचा फैसला २३ एप्रिलला होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पिंपळगांव घाडगा, निनावी, मालुंजे, साकुर, शेणित, जानोरी, नांदूरवैद्य, शिरसाठे, गरुडेश्वर ग्रामपंचायती, सर्वसाधारण प्रवर्गासाठी भरविर खुर्द, कावनई, घोटी खुर्द, वाडीवऱ्हे, पिंपळगांव डुकरा, नांदगाव बुद्रुक, पाडळी देशमुख, वाघेरे, माणिकखांब, सांजेगांव, बेलगाव कुऱ्हे, शेनवड खुर्द, भरविर बुद्रुक, मुंढेगांव, दौंडत, लक्ष्मीनगर, मोडाळे ह्या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कुऱ्हेगाव, मुरंबी आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मुकणे, गोंदे दुमाला, समनेरे, कृष्णनगर ह्या ग्रामपंचायत आरक्षित झाल्या. यापैकी काही गावे महिलांसाठी आरक्षित होणार असून त्याबाबत २३ एप्रिलला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. 

error: Content is protected !!