
इगतपुरीनामा न्यूज – १५ सप्टेंबरला शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये होणाऱ्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनाबाबत खंबाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. याप्रसंगी नाशिक जिल्हा निरीक्षक तथा माजी आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी शेतकरी जनअक्रोश मोर्चाबाबत मार्गदर्शन केले. बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताबद्दल सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी प्रदेश संघटक उमेश खातळे यांनी भाताला हमीभाव मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तालुक्यातून मोर्चासाठी वाहनांचे नियोजन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. कार्याध्यक्ष भाऊसाहेब खातळे, युवक अध्यक्ष किरण कातोरे, युवक कार्याध्यक्ष सोमनाथ घारे, युवक कार्याध्यक्ष गोकुळ जाधव, ओबीसी सेल अध्यक्ष बाळासाहेब बोडे, उपाध्यक्ष निवृत्ती गवारी, विद्यार्थी तालुकाध्यक्ष तेजस भोर, वाडीवऱ्हे गट प्रमुख संपत नाठे, तानाजी आव्हाड, विजय घारे, नरेंद्र गतीर, उपाध्यक्ष राजु उघडे, स्वयम जोंधळे, अनिकेत गोडसे, जिल्हा उपाध्यक्ष भिका पानसरे, ऋषिकेश वेल्हाळ, जगदीश डगळे, सागर टोचे, देविदास सुरुडे, नीता वारघडे, तानाजी आव्हाड आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हजर होते.
सत्तेचा दुरुपयोग होत आहे. सत्ता आल्यावर कर्ज माफ करेल असे आश्वासन दिले. मात्र मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांवर लक्ष दिले नाही. शेतकऱ्याना कोणी वाली राहिला नाही. धरणाचा तालुका असलेली इगतपुरी तालुक्याची वाईट परिस्थिती आहे. होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
- उमेश खातळे, प्रदेश संघटक