फक्त १ रुपयात शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा : ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – प्रधानमंत्री पीक विमा योजनेला खरीप ते रब्बी हंगामाच्या पुढील तीन वर्षासाठी मान्यता देण्यात आलेली असून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे विविध पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांना ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी […]

कृषी दिनाच्या निमित्ताने साकुर येथील २ शेतकरी पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – आज इगतपुरी तालुक्यात कृषी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भात शेतीच्या कृषी स्पर्धेमध्ये इंद्रायणी ६८ क्विंटल उत्पादन घेणारे साकुर येथील हभप रामदास महाराज सहाणे यांना प्रथम क्रमांक देऊन प्रथम पारितोषिक देण्यात आले. तुकाराम आनंदराव सहाणे यांनी इंद्रायणी वाणाचे हेक्टरी ५८ क्विंटल उत्पन्न घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. साकुर गावाला भुषणावह असणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांना […]

तळोघ येथे कृषी संजीवनी सप्ताहात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम घेण्यात आला. कृषी क्षेत्राची भावी दिशा यावर इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मौलिक मार्गदर्शन केले. इगतपुरीचे मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना विविधांगी माहिती दिली. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढ कशी […]

कृषी संजीवनी सप्ताहाद्वारे गावागावांमध्ये उपयुक्त विषयांवर शेतकऱ्यांचे प्रबोधन : कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यकांच्या प्रयत्नांना उदंड प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यकांकडून कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. अनेक गावांत प्रात्याक्षिके करून शेतकऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे. त्यानुसार सांजेगाव, नांदडगाव, वाडीवऱ्हे, पाडळी देशमुख, बेलगाव कुऱ्हे, वाघेरे, बळवंतनगर, कावनई, शिरसाठे, मोडाळे, मुरंबी, मालुंजे, मोगरे, सोमज, कऱ्होळे, शेवगेडांग आदी गावांमध्ये […]

वाढीव दराने युरिया खताची विक्री भोवली : घोटीच्या विक्रेत्याचा परवाना गोठवला

इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथे आज श्री स्वामी समर्थ फर्टिलायझर येथे शेतकरी प्रभाकर जाधव व नंदू भोर यांना २६६ रुपये किंमतीचे युरिया खत ३०० रुपयाला विकल्याची माहिती कृषी विभागाला दिली दिली. कृषी विभागाच्या पथकाने तात्काळ दुकानावर धाड टाकुन शहानिशा केली असता खत विक्री परवाना गोठविला आहे. तपासणी अहवाल कारवाईसाठी खत पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे तसेच […]

कृषी संजीवनी सप्ताह – मुकणे येथे महिला शेतकरी सन्मानदिन साजरा – कमी खर्चात एसआरटी पद्धतीने भातलागवडीसह शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलैला कृषिदिन साजरा होतो. यावेळी राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जातो. त्यानुसार आज मुकणे येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी महिला शेतकरी सन्मानदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सोमनाथ जोशी, बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव, उद्योजिका […]

इगतपुरी तालुक्यात १ जुलैपर्यंत “कृषी संजीवनी “सप्ताहात शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांना सुरुवात

इगतपुरीनामा न्यूज – तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी यांच्या मार्फत इगतपुरी तालुक्यात २४ जून ते १ जुलै दरम्यान “कृषी संजीवनी’ सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहात शेतकऱ्यांना शेती संदर्भात विविध विषयावर कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले आहे. कृषी […]

आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनात वाढ करा – तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर : इंदोरे येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनात वाढ करून समृद्धी साधावी. आपल्या शेतीत पारंपरिक पद्धत सोडून आधुनिकतेची कास धरल्यास उत्पन्नात वाढ होईल. शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे उत्पन्न व उत्पादन वाढवावे. यासाठी कृषी विभाग सदैव शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार आहे असे प्रतिपादन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी केले आहे. इगतपुरी तालुक्यातील […]

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्ताने इगतपुरी तालुक्यात नागली प्रकल्प : ५५० हेक्टरवर नागली प्रकल्पासह २०० शेतकऱ्यांना मिळणार प्रात्यक्षिक

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात खरिप हंगामात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त ५५० हेक्टरवर नागली प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासोबत तालुक्यातील २०० शेतकऱ्यांकडे नागली पिकांचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव, आंबेवाडी, वासाळी, इंदोरे, बारशिंगवे, खेड, कानडवाडी, भरवज, निरपण, कवडदरा, भंडारदरावाडी, शिरेवाडी, घोडेवाडी, सोनोशी, गंभीरवाडी, निनावी आदी गावांमध्ये ५५० हेक्टर क्षेत्रावर […]

वाढदिवसाचा खर्च टाळून शिदवाडीच्या निराधार, दिव्यांग शेतकऱ्यांना भाताचे बियाणे वाटप : बाजार समिती संचालक दिलीप चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा उपसरपंच दिलीप चौधरी यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून इगतपुरी तालुक्यातील खंबाळे हद्धीतील आदिवासीबहुल असणाऱ्या शिदवाडी येथे निराधार दिव्यांग शेतकऱ्यांना भाताचे बियाणे वाटप केले. यावेळी ह्या शेतकऱ्यांनी दिलीप चौधरी यांना आशीर्वाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली. खंबाळे येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेचा दुखवटा पाळून वाढदिवस साजरा न […]

error: Content is protected !!