
इगतपुरीनामा न्यूज – राजूर येथील जनावरांच्या भव्य प्रदर्शनात धामणी येथील घोटे परिवाराचा अडीच वर्षीय पोपट्या नावाचा वळू सुंदर दिसण्याच्या स्पर्धेत इतरांना मागे टाकीत चॅम्पियन ठरला. याप्रसंगी अकोलेचे आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते घोटे कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल इगतपुरी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ह्या वळूने इतरही ठिकाणी यापूर्वी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. राजूर येथे जनावरांचे प्रदर्शन तीन दिवसापासून भरले असून अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांनी आपले बैल प्रदर्शनासाठी आणले आहेत. दीड वर्षाचा असलेला पोपट्या वळू अतिशय सुंदर असून त्याची मुलाप्रमाणे घोटे कुटुंब काळजी घेतात. शेती शेतकरी जिव्हाळा असणारे तसेच बैल प्रेमी घोटे परिवार दोन पिढ्यांपासून बैलांचा सांभाळ करून काळजी घेतात. धामणी येथील राजाराम भिमा घोटे, भाऊसाहेब राजाराम घोटे, बाळासाहेब राजाराम घोटे, अरुण पंढरी घोटे, दिलीप सखाराम घोटे, रामदास किसन घोटे, रवी घोटे, सतिश घोटे, कार्तिक घोटे, परसराम मोहन भोसले आणि धामणी ग्रामस्थांनी पोपट्या वळू चॅम्पियन ठरल्याने घोटे परिवाराचे अभिनंदन केले.