इगतपुरीनामा न्यूज – जानोरी अस्वली रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम एका आठवड्यात तातडीने पूर्ण करून ह्या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू असे आश्वासन इगतपुरीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ च्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिले. त्यामुळे ह्या पुलाखाली आज सकाळी सुरु झालेले बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्यात आले. बेलगाव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष सुखदेव गुळवे यांच्या नेतृत्वाखाली हे […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील हॉटेल माऊली दारणा धरणाजवळ शुक्रवारी २ जूनला सकाळी १० वाजता शेतकऱ्यांची तातडीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील शेतकऱ्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक कारणांनी शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामाचे नियोजन, ऊस उत्पादकांना शासकीय एफआरपीप्रमाणे पैसे दिले जात नाही. शासनाने विमा कंपनीच्या माध्यमातून […]
इगतपुरीनामा न्यूज – अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडलेले आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्या येण्याचे प्रचंड हाल सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी वळसे घालून फेरा मारावा लागतो. परिणामी शेतीच्या उत्पन्नावर सुद्धा मोठा दुष्परिणाम झालेला आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्या रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत अनेक […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धारगांव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) मार्फत परंपरागत कृषी विकास योजनेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षणानुसार शेतकऱ्यांचे शेतकरी गट तयार करून विषमुक्त अन्न तयार करण्याकडे वाटचाल, चांगला ग्राहक निर्माण करून आर्थिक उत्पादन वाढविणे यासाठी काम करण्यात येणार […]
इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवून शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानंतर आज सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी कामकाज पाहिले. बाजार समितीचे […]
इगतपुरीनामा न्यूज – मागील महिन्यात प्रचंड चूरशीच्या झालेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १६ संचालक निवडून आले होते. शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागा काबीज करता आल्या होत्या. खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना ( ठाकरे ) उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन […]
इगतपुरीनामा न्यूज – नांदूरवैद्य विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची आणि व्हॉइस चेअरमनपदाची निवडणूक जेष्ठ नागरिक पंढरीनाथ लक्ष्मण मुसळे, सुखदेव गोविंद दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी सुखदेव बापू काजळे तर व्हॉइस चेअरमनपदी ज्ञानेश्वर खंडू कर्पे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शशांक पगारे, बाळासाहेब काळे, सचिव प्रमोद कहांडोळ यांनी निवडीचे कामकाज पाहिले. निवडीच्या बैठकीवेळी […]
इगतपुरीनामा न्यूज – विकासाचे राजकारण करायला आवडत असल्याने शेतकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा कसा होईल यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीला पाण्याची कमतरता पडणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी सुजलाम सुफलाम होण्यासाठी सोलर योजनाही राबवणार आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात दोनच ठिकाणी मंजूर झालेल्या उपसा सिंचन योजना पदरात पाडून घ्या. योजनांची अडचण […]
इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आर्थिक उलाढाल सुरु करण्याकडे लक्ष देणार असून अधिकाधिक कर्जपुरवठा कसा देता येईल यावर आमचा भर राहील असे प्रतिपादन देवळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित व्हॉइस चेअरमन योगेश सुरुडे यांनी केले. राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळे विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हॉइस चेअरमनपदी उभाडे येथील युवक काँग्रेसचे सरचिटणीस योगेश […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी खंडेराव शिवराम झनकर यांची निवड झाली आहे. खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बाजार समितीचे संचालक हरिदास […]