
इगतपुरीनामा न्यूज – बळीराजा शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या आणि विकासाच्या योजना राबवण्यासाठी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकरन्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांनाच विधानसभेत पाठवा असे आवाहन भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाठे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रचारसभेतही सहभाग घेऊन भूमिपुत्र संघटनेने महायुतीच्या कामांचा गौरव केला होता. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. त्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचे विनोद नाठे म्हणाले आहेत.